President: भारताचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या घेणार शप्पथ

India: शप्पथ घेतल्या नंतर 21 मानाच्या तोफांनी सलामी देणार
Draupadi Murmu
Draupadi Murmu Dainik Gomantak
Published on
Updated on

draupadi murmu: भारताचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच संविधानीक पदाची शप्पथ सोमवारी (25) घेणार आहेत,शप्पथ घेतल्या नंतर 21 मानाच्या तोफांनी त्यांना सलामी देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालया कडून सांगण्यात येत आहे की हा शप्पथ विधी सोमवारी सकाळी 10 वाजे पर्यत संसद भवनातील केंद्रीय भवनात पार पडणार आहे.

निर्वाचित राष्ट्रपती समारंभाच्या आधी संसदेत पोहोचतील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकार प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी, समारंभास उपस्थित राहतील.

ही शप्पथ सरन्यायाधीश एन.वी.रमण हे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शप्पथ देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती संबोदणार आहेत .

Draupadi Murmu
Kargil Vijay Diwas: जम्मू-काश्मीरमध्ये होणार 2000 शहीद जवानांच्या शौर्याचा सन्मान

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभाच्या समारोपाच्या वेळी, राष्ट्रपती 'राष्ट्रपती भवना'कडे रवाना होतील, जिथे त्यांना 'इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर' प्रदान केले जाईल आणि बाहेर जाणाऱ्या राष्ट्रपतींशी शिष्टाचार भेट दिली जाईल. . मुर्मू (64) यांनी गुरुवारी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून इतिहास रचला.

Draupadi Murmu
Health ministry: देशात गेल्या 24 तासात 20,279 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

मुर्मू यांनी मतदारांसह खासदार आणि आमदारांच्या वैध मतांपैकी 64 टक्क्यांहून अधिक मते मिळवली आणि मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती होणार आहेत. मुर्मू यांना 6,76,803 मते मिळाली, तर सिन्हा यांना 3,80,177 मते मिळाली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या आणि सर्वोच्च पद भूषवणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील. तसेच राष्ट्रपती बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com