Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 जुलै रोजी) राष्ट्रपती भवनात देशाच्या शूरवीरांना कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित केले.
Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान
President Droupadi MurmuDainik Gomantak

President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशाच्या शूरवीरांना कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित केले. राष्ट्रपतींनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांना 10 कीर्ती चक्र (सात मरणोत्तर) आणि 26 शौर्य चक्र (सात मरणोत्तर) प्रदान केली. विशेष शौर्य, अदम्य साहस आणि कर्तव्याप्रती अत्यंत समर्पण दाखवल्याबद्दल या पुरस्काराने शूरवीरांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, मेजर दिग्विजय सिंह रावत (स्पेशल फोर्स, 21वी बटालियन, पॅराशूट रेजिमेंट) यांना किर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर मेजर मॅनिओ फ्रान्सिस (पीएफ 21व्या बटालियन, पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल)) यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, लेफ्टनंट बिमल रंजन बेहेरा, हवालदार संजय कुमार (9 आसाम रायफल्स), फ्लाइट लेफ्टनंट ऋषिकेश जयन कारुयेदया फ्लाइंग (पायलट), कॅप्टन अक्षत उपाध्याय (20 वी बटालियन द, जाट रेजिमेंट), नायब सुभेदार बरिया संजय कुमार भामरसिंग (21 वी बटालियान, महार रेजिमेंट), मेजर अमनदीप जाखड (4थी बटालियन, द शीख रेजिमेंट) यांनाही शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान
PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

त्याचबरोबर, कॉन्स्टेबल सफिउल्लाह कादरी (जम्मू आणि काश्मीर पोलीस), मेजर विकास भांगभू सेना पदक, मेजर मुस्तफा बोहरा, रायफलमॅन कुलभूषण मंटा (जम्मू आणि काश्मीर रायफल्स, 52 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स, हवालदार विवेक सिंग तोमर (5 वी बटालियन, राजपुताना रायफल्स), रायफलमॅन आलोक राव (18 रायफल्स, एम.व्ही. सिग्नल कॉर्प्स, 63 वी बटालियन राष्ट्रीय रायफल्स) यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com