Pravasi Bharatiya Divas 2023: प्रवासी भारतीय संमेलन आजपासून सुरु, जाणून घ्या 'या' दिवसाचे महत्व

विविध देशांतील अनिवासी भारतीय या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
Pravasi Bharatiya Divas 2023
Pravasi Bharatiya Divas 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Pravasi Bharatiya Divas 2023: प्रवासी भारतीय दिवस संमेलन आजपासून सुरू होत आहे. हे संम्मेलन 10 जानेवारीपर्यंत चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. कोरोनामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रवासी भारतीय संमेलन झालेले नाही. त्यामुळेच यावेळची ही परिषद विशेष ठरण्याची अपेक्षा आहे.

हे संमेलन मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शनिवारपर्यंत 400 हून अधिक लोक इंदूरला पोहोचले आहेत. सर्व पाहुण्यांना इंदूरच्या स्टार्टअप्सची ओळख करून देण्यासाठी हे संम्मेलन आयोजित केले आहे.

प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या खास निमित्ताने इंदूरमध्ये या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवासी दिवस का साजरा केला जातो

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यानंतर त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यास महत्त्वाचे योगदान दिले आहे. म्हणूनच गांधीजींच्या आगमनाच्या आनंदात प्रवासी भारतीय दिवस आयोजित केला जातो. या विशेष प्रसंगी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारतीय हे जगातील सर्वात मोठे प्रवासी आहेत.

Pravasi Bharatiya Divas 2023
Hindu Marriages Type: हिंदू विवाहाचे अनेक प्रकार; वाचा एका क्लिकवर

इंदूरमध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित दाखवली आहे.

  • इंदूरमध्ये स्टार्टअप पार्क बनवले जात आहे

इंदूर विकास प्राधिकरण 300 कोटी रुपये खर्चून सुपर कॉरिडॉरवर एक स्टार्टअप पार्क बनवत आहे. ज्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या संम्मेलनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 जानेवारीला ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटही आयोजित केली जाईल जी 12 जानेवारीपर्यंत चालेल.

या विशेष संमेलनसाठी इंदूरमध्ये सर्व सजावट करण्यात आली आहे. ढोल-ताशांचे पथक सज्ज झाले आहे. एएनआयने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील लहान मुलीने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com