Prajwal Revanna: 'तो व्हर्च्युअल सेक्ससाठी बळजबरी करत होता...', प्रज्वल रेवन्नाविरुद्ध आणखी एका महिलेची तक्रार

Sexual Abuse Case: सेक्स स्कँडलचा आरोपी माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्याविरुद्ध तक्रारींचा सिलसिला सुरुच आहे.
prajwal revanna
prajwal revanna dainik gomantak

सेक्स स्कँडलचा आरोपी माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्याविरुद्ध तक्रारींचा सिलसिला सुरुच आहे. त्याच्या अटकेनंतर काही दिवसांनी आणखी एका महिलेने एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये प्रज्वलने मुलांना शाळेत प्रवेश देण्याच्या बदल्यात सेक्सची मागणी केल्याचा दावा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे प्रज्वलचा मोठा भाऊ सूरज रेवन्ना याच्यावर जनता दल सेक्युलरच्या (जेडीएस) पुरुष कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.

न्यूज 18 मधील वृत्तानुसार, आपल्या मुलांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारी एक गृहिणी रेवन्नाविरोधात पोलीस ठाण्यात पोहोचली. तक्रारीनुसार, ही महिला (Women) तिच्या मुलांच्या ॲडमिशनसंदर्भात भेटण्यासाठी आली असता प्रज्वलने तिचा नंबर मागितला होता. रिपोर्टनुसार, यानंतर काही वेळातच प्रज्वलने महिलेला व्हिडिओ कॉल केला आणि कथितरित्या तिला व्हर्च्युअल सेक्स करण्यास भाग पाडले.

prajwal revanna
Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

आरोपीचे म्हणणे आहे की, जेव्हा तो हसन येथे आला तेव्हा त्याने ऑक्टोबर 2019 ते 2020 दरम्यान असे 8-10 वेळा केले. रिपोर्टनुसार, तक्रारदाराचे म्हणणे आहे की, जेव्हाही तिने तिच्या मुलाच्या ॲडमिशनचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा प्रज्वल म्हणायचा की जोपर्यंत ती त्याच्यासोबत सेक्स करत नाही तोपर्यंत तिचे काम होणार नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करु असे सांगून प्रज्वलने महिलेला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.

prajwal revanna
HD Revanna: बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात; अपहरण प्रकरणात कारवाई

रिपोर्टनुसार, हे सर्व व्हिडिओ मध्यरात्रीच्या सुमारास काढण्यात आले होते. महिलेने लैंगिक छळ, पाठलाग आणि तिच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोप केले आहेत. अनेक महिलांच्या तक्रारींनंतर, प्रज्वल 31 मे रोजी भारतात (India) परतताच त्याला अटक करण्यात आली. प्रकरणाचा भडका उडताच तो परदेशात पळून गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com