सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या युवकाला अटक

8 डिसेंबर रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणारी सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या 21 वर्षीय जवाद खानला (Jawad Khan) राजस्थानच्या टोंक पोलिसांनी अटक केली आहे.
Jawad Khan
Jawad KhanTwitter/ @TonkPolice_
Published on
Updated on

तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) देखील उपस्थित होते. आतापर्यंत तीन जवानांना वाचवण्यात यश आले असल्याचे देखील सांगण्यात आले होते. मात्र या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेने ट्विट करत सांगितले की, संरक्षण कर्मचारी (CDS) जनरल बिपिन रावत बुधवारी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (Eucalyptus Hills) येथे स्टाफ कोर्समधील प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी आणि भेट देण्यासाठी जात होते. दरम्यान दुपारच्या सुमारास, चार क्रू सदस्य, CDS आणि इतर 9 प्रवासी घेऊन जाणाऱ्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ एक दुःखद अपघात झाला. मात्र सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूवरुन काही लोक आनंद साजरा करताना दिसत आहे. यातच राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Jawad Khan
CDS Bipin Rawat Death: सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

दरम्यान, खरं तर, राजस्थानचा रहिवासी असलेल्या जवाद खानने सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूवर सोशल मिडियावरील पोस्टमध्ये लिहिले की "नरकात जाण्यापूर्वी त्यांना जिवंत जाळण्यात आले". असं लिहीत जवाद खानने केवळ प्रतिष्ठेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत तर त्याने देशभरातील नागरिकांच्या भावनाही दुखावल्या. अशा परिस्थितीत जेव्हा जवाद खानची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली, तेव्हा राजस्थान भाजप नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी राजस्थानच्या टोंक पोलिसांना ट्विट करुन टॅग करत लिहिले की, या गोठय़ा प्राण्यावर, जावाद खानवर कठोर कारवाई करण्यात यावी. लक्ष्मीकांत भारद्वाज यांच्या या ट्विटनंतर टोंक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत, जवाद खानवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर राजस्थानला टोंक पोलिसांनी ट्विट करुन कळवले की, टोंक पोलिसांनी या टिप्पणीवर तात्काळ कारवाई करत, पोस्ट करणाऱ्या जावेदला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमानुसार कार्यवाही सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेला जवाद खान पोलिसांसोबत डोके टेकवून उभा होता. एकीकडे पोलिसांची कारवाई तर दुसरीकडे सोशल मीडियावर जवाद खानबद्दल बरंच काही सांगत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे असे कृत्य करणारा जवाद खान हा एकटाच नसून शिवभाई अहिर नावाच्या आणखी एका व्यक्तीने केवळ सीडीएस बिपिन रावतच नव्हे तर पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ यांच्याबद्दलही अपशब्द वापरले आहेत. 'शिवाभाई अहिरच्या' पोस्ट कमेंट एका युजरने लिहिले की, पुलवामाचे देशद्रोही मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतर आता डोभालची पाळी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com