Poco M7 Plus धमाका! खास मोबाईलप्रेमींसाठी पोकोने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन, Vivo आणि Realme चं वाढलं टेन्शन; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Poco M7 Plus 5G Launched: पोकोने खास मोबाईलप्रेमींसाठी आपला दमदार स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीने नवीन स्मार्टफोन Poco M7 Plus 5G बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी लॉन्च केला.
Poco M7 Plus 5G Launched
Poco M7 Plus 5GDainik Gomantak
Published on
Updated on

Poco M7 Plus 5G Launched: पोकोने खास मोबाईलप्रेमींसाठी आपला दमदार स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीने नवीन स्मार्टफोन Poco M7 Plus 5G बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी लॉन्च केला. 7000 mAh च्या दमदार बॅटरीसह आलेल्या या लेटेस्ट पोको स्मार्टफोनमध्ये (Smartphone) रिव्हर्स चार्जिंग, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 16 जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळतो. कंपनीने या फोनसाठी दोन ओएस अपग्रेड आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

Poco M7 Plus 5G: किंमत आणि ऑफर्स

या फोनचे दोन व्हेरिएंट्स बाजारात आले आहेत, त्यांची किंमत खालीलप्रमाणे आहे:

  • 6GB RAM / 128GB स्टोरेज: ₹13,999

  • 8GB RAM / 256GB स्टोरेज: ₹14,999

दरम्यान, या फोनची विक्री 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. लॉन्च ऑफर म्हणून हा फोन खरेदी करताना HDFC, ICICI किंवा SBI बँक (SBI Bank) कार्डने पेमेंट केल्यास 1000 चा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, 1000 चा एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे. या किंमतीमध्ये Poco M7 Plus 5G ची टक्कर Vivo T4x 5G, Realme P3 5G, iQOO Z10x आणि Redmi 13 5G सारख्या स्मार्टफोन्सशी असेल.

Poco M7 Plus 5G Launched
विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Poco M7 Plus 5G: स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: यात 5.9 इंच फुल एचडी प्लस रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 850 निट्स पीक ब्राइटनेससह येतो.

  • चिपसेट: या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6S जनरेशन 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

  • ऑपरेटिंग सिस्टिम: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित HyperOS 2.0 वर काम करतो.

  • कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • बॅटरी: यात 7000 mAh ची सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 18W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com