PM नरेंद्र मोदी यांची 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट

180 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार..
PM Narendra Modi visits Kedarnath on November 5
PM Narendra Modi visits Kedarnath on November 5Dainik Gomantak

डेहराडून : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 नोव्हेंबरला (November) उत्तराखंडमधील केदारनाथला (visits Kedarnath) भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पंतप्रधान केदारनाथ मंदिरात पूजा करतील तसेच, श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन करतील आणि श्री आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करतील. 2013 च्या पुरात या मंदिराचं प्रचंड नुकसान झालं होतं या विध्वंसानंतर समाधी पुन्हा बांधण्यात आली आहे.

PM Narendra Modi visits Kedarnath on November 5
नियमित जीमला जाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका का? भारतातील नामवंत डॉक्टरांनी दिले उत्तर

पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ मंदिरात पूजा करतील आणि त्यानंतर आदि शंकराचार्यांच्या समाधीचे उद्घाटन करून त्यांच्या मूर्तीचे उद्घाटन करतील. 6 नोव्हेंबरपासून हिवाळ्यामुळे केदारनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत.

2013 मध्ये आलेल्या भीषण पुरात या समाधीचे नुकसान झाले होते. त्यानंतर ते बांधण्यात आले. हे पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आणि निर्देशानुसार करण्यात आल्याचे पीएमओने म्हटले आहे. त्यावर त्यांनीही सातत्याने लक्ष ठेवले आहे.

यादरम्यान पंतप्रधान सरस्वती अस्थापथाच्या आजूबाजूच्या बांधकाम आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. यावेळी पंतप्रधान एका जाहीर सभेलाही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

PM Narendra Modi visits Kedarnath on November 5
'रस्ते बंद करून नमाजपठण करणारे... अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पीएमओच्या म्हणण्यानुसार, सरस्वती अस्थपथ आणि घाट, मंदाकिनी अस्थापथ, तीरथ पुरोहित आवास आणि मंदाकिनी नदीवरील गुरुड चटी पुलासह इतर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. हे प्रकल्प 130 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहेत.

यासोबतच 180 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये संगम घाट, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, मंदाकिनी अस्थपथ लाईन मॅनेजमेंट, रेन प्रोटेक्शन साइट आणि सरस्वती नागरी सुविधा इमारतीच्या पुनर्विकासाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com