CDS पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोदी सरकारने केला मोठा बदल

नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

नरेंद्र मोदी सरकारने (PM Narendra Modi) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. CDS पदासाठी पात्र अधिकार्‍यांची व्याप्ती वाढवत, संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्या अंतर्गत नौदल आणि हवाई दलात सेवा करणारे लेफ्टनंट जनरल ( Lieutenant General) किंवा त्यांच्या समकक्ष देखील CDS बनू शकतात. (The Modi government has made major changes in the rules for appointment to the post of CDS)

PM Narendra Modi
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार गृहमंत्री अमित शहा यांची भेट

पात्रतेच्या निकषांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नुकतेच निवृत्त झालेले लष्करप्रमुख आणि उपप्रमुखही या पदासाठी पात्र असणार आहेत, जरी यासाठी वयोमर्यादा 62 वर्षे असली तरी. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पत्नीसह काही उच्च लष्करी अधिकाऱ्यांनाही यावेळी जीव गमवावा लागला. तेव्हापासून भारताच्या सीडीएसचे पद रिक्तच आहे.

तिन्ही लष्करप्रमुख उद्या दुपारी नॅशनल मीडिया सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहेत. ही पत्रकार परिषद सरकारच्या महत्त्वाच्या धोरणाबाबत बोलावली गेली आहे. तिन्ही लष्करप्रमुख ड्युटी दौऱ्याबाबत घोषणा करणार आहेत, तसेच त्याअंतर्गत 40 ते 50 हजार सैनिकांची भरती केली जाणार आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन ते चार वर्षांची नोकरी असणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर 75 टक्के लोक नोकरी सोडतील तर 25 टक्के लोक सैन्यात भरती होऊ शकतील असे सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुमारे अडीच वर्षांपासून कोरोनामुळे सैन्यात शिपाई भरती करण्यात आलेली नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com