Modi And Yogi's Sisters Met: उत्तराखंडमध्ये मोदी-योगींच्या बहिणींची भेट; एकमेकांना मारली मिठी

पंतप्रधानांच्या बहिणीने ऋषिकेशमध्ये नीलकंठ महादेव मंदिरात घेतले दर्शन
Modi And Yogi's Sisters Met:
Modi And Yogi's Sisters Met:Dainik Gomantak

Modi And Yogi's Sisters Met: पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण बसंती बेन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी देवी या नुकत्याच एकमेकांना भेटल्या. बसंती बेन कुटुंबासह उत्तराखंडमधील ऋषिकेशला गेल्या होत्या.

या दोघींनीही एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली. या भेटीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यावेळी बसंती बेन यांनी शशी देवींचे कौतुक केले.

Modi And Yogi's Sisters Met:
Tiracol Police News: तेरेखोल येथे पोलिस कॉन्स्टेबलला हृदयविकाराचा झटका; कर्तव्य बजावत असतानाच मृत्यू

पंतप्रधान मोदींची धाकटी बहीण बसंती बेन यांनी त्यांचे पती आणि काही नातेवाईकांसह उत्तराखंडमधील कोठार गावातील प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिराला भेट दिली.

मंदिरातून परतताना त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची थोरली बहिण शशीदेवी यांच्या दुकानात थांबल्या. यावेळी दोघींनीही एकमेकांना एकमेकांना मिठी मारली.

देशातील दोन मोठ्या नेत्यांच्या बहिणींनी एकत्रित काही वेळ व्यतित केला. पंतप्रधान मोदींच्या बहिणीने शशी देवी यांच्या विनम्र जीवनशैलीचे कौतुक केले. मोदी आणि योगी या दोन्ही नेत्यांचे कुटूंबीय प्रसिद्धीपासून दूर राहतात.

Modi And Yogi's Sisters Met:
Fr Bolmax Pereira यांची जामिनासाठी मडगाव न्यायालयात धाव

योगींची बहिण पूजेचे साहित्य विकते, तर पतीचे चहाचे दुकान

शशी देवी उत्तराखंडच्या कोठार गावात राहतात आणि माता भुवनेश्वरी प्रसाद भंडार नावाने दुकान चालवतात. या दुकानात त्या सिंदूर, घंटा आणि पूजेचे साहित्य विकतात. त्यांचे पती जय श्री गुरु गोरक्षनाथ जी नावाने चहाची टपरी चालवतात.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तराखंडचे रहिवासी आहेत. त्यांची आई आणि भाऊ पौरी जिल्ह्यातील पंचूर गावात राहतात. एका मुलाखतीत योगी यांनी सांगितले होते की, ते गेल्या वर्षी आई आणि बहिणीला भेटायला गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com