Video: ''यह तो कमाल है...'', पीएम मोदींनी बिल गेट्स यांना शिकवले नमो ॲप; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

PM Modi & Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट झाली.
PM Modi & Bill Gates
PM Modi & Bill GatesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi & Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट झाली. बिग गेट्स या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. भेटीदरम्यान या दिग्गजांनी बदलते तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, महिला सशक्तीकरण तसेच AI च्या माध्यमातून भारतात डिजिटल पेमेंट क्रांती या सर्वांगिण विषयावर विशेष चर्चा केली होती. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ ANI ने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये पीएम मोदी टेक दिग्गज बिल गेट्स यांना नमो ॲपचे खास तंत्रज्ञान समजावून सांगताना दिसत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, पीएम मोदींनी बिल गेट्स यांना नमो ॲपद्वारे सेल्फी घेण्यास शिकवले. या ॲपचा रिस्पॉन्स पाहून गेट्स चकित झाले. बिल गेट्स या महिन्याच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स (AI) चा वापर लोककल्याणासाठी करण्यात यावा यावर दोघेही सहमत झाले. त्याचबरोबर त्यांनी महिलांच्या नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यावर चर्चा केली. विशेष म्हणजे, पीएम मोदी आणि बिल गेट्स यांच्यातील या भेटीचा संपूर्ण व्हिडिओ उद्या म्हणजेच 29 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

PM Modi & Bill Gates
PM Modi: वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उचलले 'त्रिशूळ' , पाहा व्हिडिओ

दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर गेट्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली. गेट्स आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे नेहमीच प्रेरणादायी असते. त्यांच्याबरोबर अनेक विषयावर चर्चा करता येते. लोकहितासाठी AI चा वापर करण्यात यावा यावरआम्ही चर्चा केली. शिवाय, जगाला भारताकडून अजून काय शिकता येईल यावरही चर्चा केली.'' गेट्स यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले की, “खरोखर, एक अप्रतिम भेट! गेट्स यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा करताना नेहमीच खूप काही शिकायला मिळते.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Artificial Intelligence (AI) Government Regulation
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com