Project Cheetah: PM मोदींनी वाढदिवसानिमित्त देशाला दिली 'ही' मोठी भेट

Cheetah From Namibia: PM मोदींनी वाढदिवसानिमित्त देशाला दिली खास भेट
Project Cheetah
Project CheetahDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते आयात केले आहे. या सर्व चित्त्यांना उद्यानाच्या आतील भागात विशेष बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. हे सर्व चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहेत. या चित्त्यांपैकी 5 माद्यांचे वय 2 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षांच्या दरम्यान आहे. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.

* दक्षिण आफ्रिकेचे सरकार लक्ष ठेवेल

'आफ्रिकन चित्ता इंट्रोडक्शन प्रोजेक्ट इन इंडिया' 2009 मध्ये सुरू झाला. भारताने चित्यांच्या आयातीसाठी नामिबिया सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. गावातील इतर गुरांनाही लसीकरण (Vaccine) करण्यात आले आहे. जेणेकरून चित्तांमध्ये कोणताही संसर्ग होऊ नये. 

चित्त्यांसाठी 5 चौरस किलोमीटरचे विशेष वर्तुळ तयार करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि वन्यजीव तज्ञ त्यांच्यावर लक्ष ठेवतील. चित्त्यांना येथील भारतीय हवामानाशी जुळवून घेण्यास एक ते तीन महिने लागू शकतात.

नामिबियातून चित्ते का आयात केले गेले?

हिमालयाचा प्रदेश सोडला तर भारतात (India) चित्ता सापडला नाही असे एकही ठिकाण नव्हते. आशियाई चित्ता अजूनही इराण, अफगाणिस्तानमध्ये आढळतात. दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून चित्ता (Cheetah) येत आहेत. कारण तिथल्या दिवसाची आणि रात्रीची लांबी भारतासारखीच आहे आणि इथले तापमानही आफ्रिकेसारखेच आहे.

Project Cheetah
SCO President: PM मोदींनी प्रथमच घेतली इराणच्या अध्यक्ष्यांची भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहते तर किमान तापमान 6 ते 7 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते, जे चित्त्यांसाठी अनुकूल आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान, विंध्याचल पर्वत रांगेत वसलेले, मध्य प्रदेशातील श्योपूर आणि मुरैना जिल्ह्यात येते. 2018 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com