Special Session Of Parliament: नेहरू, गांधी परिवाराच्या कार्याचा मोदींकडून गौरव; पंतप्रधानांच्या भाषणातील 5 मुद्दे

भारताच्या लोकशाहीच्या सुवर्ण प्रवासातील हा एक महत्त्वाचा अध्याय आहे, जो या वास्तूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या शिरपेचात लोकशाहीची ताकद दाखवेल.
PM Modi's Speech In Special Session
PM Modi's Speech In Special SessionDainik Gomantak

PM Modi praises the work of Nehru and Gandhi family in Special Session Of Parliament; Prime Minister Narendra Modi's speech in 5 points:

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सभागृहाला संबोधित केले. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.

ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता हे खरे आहे. पण हे आपण कधीच विसरू शकत नाही, आपण अभिमानाने सांगू शकतो की या वास्तूच्या उभारणीत देशवासीयांचा घाम होता, मेहनत देशवासीयांची होती, पैसाही देशवासीयांचा होता.

75 वर्षांच्या प्रवासात अनेक लोकशाही परंपरा आणि प्रक्रिया निर्माण झाल्या आहेत. या सभागृहातील प्रत्येक सदस्याने सक्रिय योगदान दिले आहे.

नवीन इमारतीत गेलो तरी जुनी वास्तू येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. भारताच्या लोकशाहीच्या सुवर्ण प्रवासातील हा एक महत्त्वाचा अध्याय आहे, जो या वास्तूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या शिरपेचात लोकशाहीची ताकद दाखवेल.

जुन्या संसदेत पंतप्रधान मोदींचे शेवटचे भाषण

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 75 वर्षांच्या कामगिरीचे स्मरण करण्याची आणि नवीन संसदेत जाण्यापूर्वी त्या प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यापूर्वी हे भवन इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे आसन होते. स्वातंत्र्यानंतर त्याला संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही वास्तू बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता हे खरे आहे, पण या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशातील जनतेने घाम, कष्ट आणि पैसाही गुंतवला हे आपण विसरू शकत नाही.

नेहरू, गांधी परिवाराचा गौरव

या जुन्या संसद भवनाता शेवटचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी नेहरू-गांधी परिवाराचा गौरव केला.

देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजयेपी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एक मोठी साखळी आहे. ज्यांनी या सभागृहाचे नेतृत्व केले आणि सभागृहाच्या माध्यमातून देशाला दिशा दिली, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, जेव्हा देशाने राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना गमावले, तेव्हा या सभागृहाने त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मी आज सर्वांना अभिवादन करतो.

देशाला नवा आकार देण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रयत्न केले आहेत. आज त्या सर्वांचा गौरव करण्याची संधी आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया, चंद्रशेखर, अडवाणी, अशी असंख्य नावे आहेत ज्यांनी आपले हे सभागृह समृद्ध करण्यात, चर्चा समृद्ध करण्यात, देशातील सामान्य माणसाला बळ देण्याचे काम केले, असे मोदींनी स्पष्ट केले.

कॅश फॉर व्होटचा उल्लेख

नरसिंह राव यांच्या सरकारने धाडसाने जुनी आर्थिक धोरणे सोडून नवा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, ज्याचे परिणाम आज देशाला मिळत आहेत, असे मोदी म्हणाले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने या सभागृहात अटलजींनी निर्माण केलेले सर्व शिक्षा अभियान, आदिवासी कार्य मंत्रालय, पूर्वोत्तर मंत्रालय पाहिले. अणुचाचणी हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक बनले.

युपीए सरकारचा कॅश फॉर व्होट घोटाळाही याच सभागृहाने पाहिल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला.

कलम 370 सारखे ऐतिहासिक निर्णय याच सभागृहात

संसदेच्या आठवणी सांगताना मोदी म्हणाले, "आण्विक कराराला याच सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. आणि कलम ३७०, वन नेशन वन टॅक्स, जीएसटी, वन रँक-वन पेन्शन यासारखे निर्णय याच सभागृहात पाहायला मिळाले. गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही येथेच घेण्यात आला."

भारताच्या लोकशाहीत आपण अनेक चढउतार पाहिले आहेत. हे संसद भवन लोकशाहीची ताकद आणि लोकशाहीची साक्षीदार आहे. या सभागृहात चार खासदार असलेला पक्ष सत्तेत आहे. आणि 100 खासदार असलेला पक्ष विरोधात. या सभागृहात एका मतानेही सरकार पडलेलेही पाहिले आहे. असेही मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर

जेव्हा मी पहिल्यांदा संसद सदस्य झालो. खासदार म्हणून पहिल्यांदाच या इमारतीत प्रवेश केला. सहज मी या संसद भवनाच्या उंबरठ्यावर डोके टेकवून लोकशाहीच्या या मंदिराला नमस्कार केला. तो क्षण माझ्यासाठी भावनांनी भरलेला होता. असे पंतप्रधान मोदी म्हणाले

मी कल्पनाही करू शकत नव्हतो, पण भारत ही लोकशाहीची ताकद आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी पोरं संसदेत पोहोचली. देश माझा इतका सन्मान करेल, आशीर्वाद देईल याची मी कल्पनाही केली नव्हती. अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com