PM Modi: ''...तरीही नवाझ शरीफ यांच्या लेकीच्या लग्नाला गेलो'', PM मोदींनी खासदारांना सांगितला पाकिस्तान भेटीचा किस्सा

PM Modi: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.30 वाजता फोन आल्यानंतर खासदारांना अनौपचारिक भोजनाची माहिती मिळाली.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi Went Nawaz Sharif Daughter Wedding:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यादरम्यान भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनॉन कोन्याक, टीडीपी खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे आणि बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनी पंतप्रधान मोदींसोबत भोजन केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.30 वाजता फोन आल्यानंतर खासदारांना अनौपचारिक भोजनाची माहिती मिळाली. 'चला, तुम्हाला एक शिक्षा द्यायची आहे,' असे पंतप्रधान मोदी खासदारांना म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि खासदारांनी कॅन्टीनमध्ये शाकाहारी जेवण आणि नाचणीचे लाडू खाल्ले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या भोजनादरम्यान एका खासदाराने पंतप्रधान मोदींना नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नात त्यांच्या अनियोजित भेटीबद्दल विचारले असता, पंतप्रधान म्हणाले की, मी दुपारी 2 वाजेपर्यंत संसदेत होतो.

त्यानंतर मी अफगाणिस्तानला (Afghanistan) रवाना झालो. परत येतानाच मी पाकिस्तानात थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावर, एसपीजीने पाकिस्तानात उतरण्यास नकार दिला. पीएम मोदींनी पुढे सांगितले की, एसपीजीच्या नकारानंतरही त्यांनी नवाझ शरीफ यांना फोन केला आणि विचारले की ते त्यांना रिसिव्ह करतील का. त्यानंतर ते (पीएम मोदी) पाकिस्तानला (Pakistan) गेले.

दरम्यान, खासदारांसोबत जेवण करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा प्रवास, अनुभव आणि योगाबद्दल अनौपचारिक संवाद साधला. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, खिचडी हे त्यांचे आवडते खाद्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Modi Digital India New Chapter
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Nandan Nilekani Exam Reform Task Force
Nawaz Sharif POK Prime Minister Claim
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com