सनातन धर्म आणि इंडिया वादावर PM मोदींनी मंत्र्यांना दिले निर्देश, म्हणाले- 'गरज असेल तेव्हाच...'

India Vs Bharat Row: सनातन धर्म आणि इंडिया वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बुधवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

Sanatana Dharma BJP: सनातन धर्म आणि इंडिया वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बुधवारी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना या वादावर जास्त बोलणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

सनातनच्या मुद्यावर सरकारचा एक मंत्री बोलेल, त्यासंबंधी त्यांनी योग्य ते उत्तर द्यावे. पण भाषेची तारतम्यता बाळगली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

तसेच उत्तरे संपूर्ण तथ्यांसह द्यावीत. देशाचे नाव बदलण्याच्या मुद्यावर जास्त न बोलण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिल्याचेही सांगण्यात आले. या वादावर अधिकृत लोकांनीच बोलावे, असे ते म्हणाले.

दरम्यान, चेन्नई येथे 2 सप्टेंबर रोजी स्टॅलिन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तामिळनाडूचे (Tamil Nadu) युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त टिप्पणी केल्याने वाद सुरु झाला.

सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू संसर्ग, डेंग्यू आणि मलेरियाशी करुन, ते नष्ट करण्याचा सल्ला दिला होता.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी उदयनिधींच्या या वक्तव्याचे समर्थन केले होते. यानंतर भाजपने स्टॅलिन आणि खर्गे यांच्या पुत्रांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला होता.

PM Narendra Modi
Madhya Pradesh: "मुस्लिम मुलीशी लग्न केल्यास हिंदू तरुणाला मिळणार 11 हजार रुपये", हिंदू धर्म सेनेची खळबळजनक घोषणा

उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर आणि प्रियांक खर्गे यांच्यावर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी बुधवारी सांगितले की, वकील हर्ष गुप्ता आणि राम सिंह लोधी यांनी मंगळवारी संध्याकाळी रामपूरच्या सिव्हिल लाइन्स कोतवाली येथे हा गुन्हा दाखल केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात उदयनिधी आणि प्रियांक यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याचा आणि समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com