PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा, 3 कोटी अतिरिक्त घरांना मंजूरी

Modi Cabinet First Meeting: शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे.
Modi Cabinet First Meeting
Modi Cabinet First MeetingDainik Gomantak

Modi Cabinet First Meeting: शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरांना मंजूरी दिली आहे.

याशिवाय, पीएम आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये एलपीजी, टॉयलेट आणि वीज जोडणी मिळणार आहे. ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जातील, हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे देशभरातील अनेक गरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे. पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अद्भुत योजना आहे. या योजनेंतर्गत भारत सरकार देशातील गरीब लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अनेक गरीब लोकही या महागाईच्या युगात स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न साकार करू लागले आहेत.

दरम्यान, तुम्हालाही पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधीच कायमस्वरुपी घर नाही तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ अशा लोकांना मिळत नाही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत आहेत. केवळ EWS आणि LIG श्रेणीतील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Modi Cabinet First Meeting
PM Awas Yojana: खूशखबर! सरकारने जारी केले पीएम आवासचे पैसे, खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

तुम्ही EWS श्रेणीतून येत असाल, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुम्ही पीएम आवास योजनेचा लाभ घेणार असाल, तर तुम्हाला या पात्रता अटींची माहिती असणे आवश्यक आहे. पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करु शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल. तिथे एजंट तुमची पात्रता तपासेल आणि योजनेसाठी अर्ज करेल.

दुसरीकडे, मोदी कॅबिनेटने पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांनाही दिलासा देणारा निर्णय घेतला. PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता म्हणून 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले. बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच पहिली फाइल शेतकरी हिताची होती. आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.

Modi Cabinet First Meeting
PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! ऐकून तुम्हीही म्हणाल...

दरम्यान, 2019 मध्ये सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. ही रक्कम दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाते, जी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अंतरिम अर्थसंकल्पानुसार, सरकारने कृषी मंत्रालयासाठी 2024-25 साठी 1.27 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, जी आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत किंचित जास्त आहे. संपूर्ण अर्थसंकल्प जुलै 2024 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com