PM Awas Yojana: खूशखबर! सरकारने जारी केले पीएम आवासचे पैसे, खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

PM Awas Yojana: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता पीएम आवास योजने (PM Awas Yojana List) संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

PM Awas Yojana: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता पीएम आवास योजने (PM Awas Yojana List) संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. पीएम आवास योजनेची रक्कम सरकारने जाहीर केली आहे.

जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यात कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत ते तपासा. केंद्र आणि राज्य सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देशभरात वेळोवेळी दिले जातात.

355 कोटी जारी केले

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने आता PM आवाससाठी पैसे जारी केले आहेत. राज्य सरकारने 355 कोटी 34 लाख रुपये जाहीर केले आहेत. यातून सुमारे 35 हजार 580 लाभार्थ्यांची घरे बांधण्यात येणार आहेत.

Money
PM Awas Yojana: 'पंतप्रधान आवास'मुळे तुटले चौघांचे घर; हप्ता बँकेत जमा होताच प्रियकरासोबत पळून गेली पत्नी...

या योजनेंतर्गत घर कोण खरेदी करु शकेल?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे घर नाही अशा व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात.

त्यासाठी 2.50 लाखांची मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. पहिला हप्ता 50 हजार. 1.50 लाखांचा दुसरा हप्ता. तर तिसरा हप्ता 50 हजारांसाठी दिला जातो. राज्य सरकार एकूण 2.50 लाख रुपयांपैकी 1 लाख देते. त्याचबरोबर, केंद्र सरकार 1.50 लाख अनुदान देते.

ही योजना 2015 मध्ये सुरु झाली

सर्व गरीब आणि गरजूंना केंद्र सरकारकडून (Central Government) कायमस्वरुपी घर मिळू शकते, त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी लागू केली होती. तेव्हापासून आजपर्यंत करोडो लोकांना घरे मिळाली आहेत.

Money
PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! ऐकून तुम्हीही म्हणाल...

pmaymis.gov.in वर भेट देऊन अर्ज कसा करावा (pmaymis.gov.in वरुन PMAY साठी अर्ज कसा करावा)

>> सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जा

>> वेबसाईटच्या वर तुम्हाला 'Citizen Assessment' चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.

>> येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्या पत्त्यानुसार पर्याय निवडा.

>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.

Money
PM Kisan Yojana: करोडो शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, मिळू शकतो 13 वा हप्ता

>> यानंतर ऑनलाइन फॉर्म उघडेल.

>> या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.

>> अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.

>> सबमिट केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज नंबर मिळेल.

>> त्याची प्रिंट काढा आणि जतन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com