Bombay High Court
Bombay High CourtDainik Gomantak

Bombay High Court: घरात येशू ख्रिस्ताचा फोटो लावला म्हणजे धर्मांतर केले असे होत नाही : उच्च न्यायालय

17 वर्षीय तरुणीने याबाबतची आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.
Published on

Bombay High Court Orders Caste Certificate: घरात येशू ख्रिस्ताचा फोटो असण्याचा अर्थ त्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असा होत नाही, असे एका याचिकेवर निवाडा देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. एका 17 वर्षीय तरुणीने याबाबतची आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र छाननी समितीने सप्टेंबर 2022 मध्ये तिचे महार जात प्रमाणपत्र अवैध ठरण्याचे आदेश दिले. या आदेशाला आव्हान देणारी याचिका या तरुणीने दाखल केली होती.

Bombay High Court
धक्कादायक! मुंबईतील वांद्रे फ्लायओव्हरवर तरुणाने घेतला गळफास; व्हिडिओ व्हायरल

तरुणीने असा दावा केला की "ती 'महार' समाजातील आहे, ज्याला संविधान (अनुसूचित जाती) आदेश, 1950 अंतर्गत 'अनुसूचित जाती' म्हणून ओळखले जाते." मात्र दक्षता कक्षाच्या अहवालानंतर तिचा हा दावा अवैध ठरला.

22 सप्टेंबरला जात प्रमाणपत्र समितीने “महार” म्हणून जातीचा दावा अवैध ठरवला. यानंतर याचिकाकर्तीने तिच्या वडिलांमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दक्षता कक्षाच्या अहवालात असे म्हटले होते की, "समितीच्या दक्षता कक्षाने तपास केला असता याचिकाकर्त्याचे वडील आणि आजोबा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे आणि त्यांच्या घरात येशू ख्रिस्ताचा फोटो टांगलेला आढळून आल्यानंतर त्यांचा जातीचा दावा अवैध ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला."

"त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याने त्यांचा इतर मागासवर्गीय वर्गात समावेश करण्यात आल्याचे समितीने म्हटले होते."

यावर याचिकाकर्त्या तरुणीने दावा केला आहे की, येशू ख्रिस्ताचा फोटो तिला कोणीतरी भेट म्हणून दिला होता आणि तिने ते आपल्या घरात लावला होता.

दरम्यान या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "तपासादरम्यान, दक्षता कक्षाला याचिकाकर्त्याच्या कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलाचा कोणताही पुरावा आढळला नाही."

"समितीच्या अधिकाऱ्याने याचिकाकर्त्याच्या घरी भेट दिली. यावेळी घरात येशू ख्रिस्ताचा फोटो पाहिला आणि असे गृहीत धरले की याचिकाकर्त्याचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. घरात येशू ख्रिस्ताचा फोटो आहे, याचा अर्थ त्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे यावर कोणतीही व्यक्ती विश्वास ठेवणार नाही किंवा हे स्वीकारणार नाही," असे कोर्टाने म्हटले आहे.

Bombay High Court
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत कुंकळ्ळीकरांसाठी ‘शाप’; मुख्यमंत्र्यांनी पाहणी करावी : युरी आलेमाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com