मोफत सिनेमा पाहण्याच्या नादात बसू शकतो मोठा फटका! 'Pikashow' वापरत असाल तर वेळीच व्हा सावध; गृह मंत्रालयाने दिला इशारा

Pikashow App: आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या किमतींमुळे अनेक युजर्स मोफत चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यासाठी विविध अनधिकृत ॲप्सचा आधार घेतात.
Pikashow
PikashowDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या किमतींमुळे अनेक युजर्स मोफत चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यासाठी विविध अनधिकृत ॲप्सचा आधार घेतात. यामध्ये 'पिकाशो' (Pikashow) हे ॲप अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, जर तुम्हीही या ॲपचे युजर असाल, तर सावधान! पिकाशोचा वापर करणे तुम्हाला केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर कायदेशीररित्याही महागात पडू शकते. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर'ने (I4C) यासंदर्भात अधिकृत इशारा जारी केला आहे.

गोपनीय माहिती आणि बँक खाते धोक्यात

सायबर दोस्त (@Cyberdost) या अधिकृत हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटनुसार, 'फ्री मुव्हीज'च्या नावाखाली पिकाशोसारखी ॲप्स युजर्सचा डेटा चोरत आहेत. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्याने युजर्सना ते त्रयस्थ (Third-party) वेबसाईटवरून डाऊनलोड करावे लागते.

अशा वेबसाईटवरून ॲप डाऊनलोड करताना तुमच्या फोनमध्ये घातक व्हायरस, मालवेअर किंवा स्पायवेअर शिरू शकतात. एकदा का हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये आले की, तुमचे फोटो, वैयक्तिक मेसेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्याची गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते.

Pikashow
Goa ZP Election: जिल्‍हा पंचायती भाजपकडे की विरोधक मारणार बाजी? जनतेचा कल होणार स्पष्ट; मंत्री, आमदारांच्‍या भवितव्‍याचाही फैसला

होऊ शकते कायदेशीर कारवाई

पिकाशोवर उपलब्ध असलेले बहुतांश साहित्य हे 'पायरेटेड' असते, म्हणजेच ते मूळ मालकाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या प्रसारित केले जाते. भारतीय कॉपीराइट कायद्यानुसार, पायरेटेड कन्टेन्ट पाहणे किंवा त्याचा प्रसार करणे हा दंडनीय अपराध आहे.

केवळ मनोरंजनासाठी अशा अनधिकृत माध्यमांचा वापर केल्यास तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. "पायरेसी हा गुन्हा आहे, त्यामुळे विचार करूनच कोणतेही ॲप इन्स्टॉल करा," अशी स्पष्ट चेतावणी सरकारने दिली आहे.

Pikashow
Goa ZP Election: जिल्‍हा पंचायती भाजपकडे की विरोधक मारणार बाजी? जनतेचा कल होणार स्पष्ट; मंत्री, आमदारांच्‍या भवितव्‍याचाही फैसला

कशी घ्याल काळजी?

सायबर तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता केवळ अधिकृत ॲप स्टोअरवरूनच (उदा. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर) ॲप्स डाऊनलोड करावेत. अनोळखी लिंकवरून एपीके (APK) फाईल्स डाऊनलोड करणे टाळावे.

मोफत सिनेमाच्या नादात स्वतःची सुरक्षा आणि मेहनतीची कमाई धोक्यात घालणे मूर्खपणाचे ठरू शकते. डिजिटल सुरक्षेसाठी सावधगिरी हाच एकमेव मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com