Murder Case: पुन्हा मृतदेहाचे तुकडे! दिल्लीसारखी गाझियाबादमध्ये घटना; पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेहाचे 8 तुकडे

मिहलाल प्रजापती असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

श्रद्धा वालकर प्रकरणाने देश उद्विग्न होत असताना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथेही एक अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकरावर चाकूने वार करून त्याच्या मृतदेहाचे आठ तुकडे करून फेकून दिल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली.

मिहलाल प्रजापती असे या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने रिक्षाचालक आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीसाठी सुरू आहे. या संबंधी सविस्तर माहिती अशी की, प्रजापती त्याच्या पत्नी आणि चार मुलांसह खोडा कॉलनीत राहत होता. प्रजापतीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीचे अक्षय कुमार (25) सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.  

या जोडप्याच्या 12 वर्षांच्या मुलीवर दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यावेळी प्रजापतीच्या घरी अक्षयचे येणे-जाणे वाढले. एकेदिवशी प्रजापतीच्या पत्नीनेच अक्षयला मुलांची काळजी घेण्यासाठी घरी बोलावले होते

प्रजापतीचा घरमालक विकास यानेही पोलिसांना सांगितले की, त्याच्या भाडेकरूने म्हणजेच प्रजापतीने ही हत्या केल्याचा त्याला संशय आहे. त्याने गुरुवारी रात्री अक्षयला प्रजापतीच्या घरात जाताना पाहिले होते आणि तेव्हापासून तो बेपत्ता होता असे घरमालकाचे म्हणणे होते.

Crime News
Rajnath Singh: युद्धाची गरज पडलीच तर... NCC कॅम्पमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

दरम्यान पोलिसांना अक्षय बेपत्ता असल्याची खबर मिळाल्यावर त्यांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान शनिवारी त्यांना खोडा कॉलनी परिसरात एक संशयास्पद गोणी दिसल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने परिसरात शोध सुरू केल्यावर त्यांना डोके, हात, पाय, पोट आणि उर्वरित भाग अशा रीतीने मृतदेहाचे 8 तुकडे केलेली गोणी आढळली.

Crime News
Rajdhani Express मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन, चौकशीत धक्कादायक माहिती उघड...

प्रजापतीचा घरमालक विकास याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी प्रजापतीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर त्याने अक्षयची हत्या केल्याचे कबूल केले. प्रजापतीचे घरमालक, विकास यांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com