निवडणुकांमुळेच कृषी कायदे मागे पी. चिदंबरम यांचं मत तर केजरीवालांचंही सरकारवर टीकास्त्र

मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया संसदेमध्ये व्हायला हवी. कारण भाजप हा खोटारडा पक्ष असून तो सामान्यांची मुस्कटदाबी करत आहे.असा जोरदार हल्लाबोल काँगेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.
P.Chidambaram attacks on Central government
P.Chidambaram attacks on Central government Dainik Gomantak

देशातल्या पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव आणि आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2022) पराभव दिसू लागल्यानेच शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे मागे (Farm Laws) घेतल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी केली आहे . हा शेतकऱ्यांचा विजय असून यापुढील आंदोलनासाठीही शेतकऱ्यांना (Farmer Protest) काँग्रेसचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते.(P.Chidambaram attacks on Central government)

यावेळी बोलताना , केंद्र सरकारने लोकहितविरोधी, हटवादी तसेच शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधातल्या योजना आणि कायदे आणले आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला असून त्याचा परिणाम सरकारला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आला. त्याचबरोबर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया संसदेमध्ये व्हायला हवी. कारण भाजप हा खोटारडा पक्ष असून तो सामान्यांची मुस्कटदाबी करत आहे.असा जोरदार हल्लाबोल काँगेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या लढ्या समोर केंद्राला नमते घेत तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पडले, हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. नेते नव्हे, तर जनताच राज्य करते आणि लोकशाहीत सरकारला नेहमीच जनतेचे ऐकावे लागते, हे शेतकऱ्यांनीच सर्वांना दाखवून दिले असल्याचे मत केजरीवालांनी मांडले आहे. त्याचबरोबर केरीवालांनी सरकारवर टीका करत आजचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. शेतकऱ्यांना दहशतवादी, खलिस्तानी आणि देशद्रोही ठरवून त्यांच्या आंदोलनाला तडा देण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले, पण स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच शेतकरी लढले आणि जिंकले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करून हे कायदे आधी मागे घेतले असते तर आंदोलनात शहीद झालेल्या ७०० शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

P.Chidambaram attacks on Central government
'कृषी कायद्याप्रमाणेच कलम 370 हटवण्याचा निर्णय मागे घ्या'

दरम्यान दरम्यान गेल्या एका वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला यश आलेले पाहायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले, 'आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com