तृणमूलच्या खासदाराचे राज्यसभेतून निलंबन

राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी शुक्रवारी शांतनु सेन यांच्या निलंबनाची घोषणा केली
Parliament session: TMC's Santanu Sen suspended from RajyaSabha
Parliament session: TMC's Santanu Sen suspended from RajyaSabhaDainik Gomantak
Published on
Updated on

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शांतनु सेन यांना राज्यसभेच्या उर्वरित अधिवेशनातून निलंबित केले गेले आहे. सभागृहात अशोभनीय वर्तनासाठी त्यांना निलंबित करण्यात आले असून राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी शुक्रवारी शांतनु सेन यांच्या निलंबनाची घोषणा केली. जेव्हा सभागृहाची बैठक सुरू झाली तेव्हा सभापती एम. वेंकैया नायडू यांनी गुरुवारी झालेली घटना ही असभ्य असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

गुरुवारी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव इस्त्रायली पेगाससच्या माध्यमातून भारतीयांची हेरगिरी केल्याच्या मुद्द्यावरून सभागृहात निवेदन देत होते. त्याच वेळी तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य आणि काही अन्य विरोधी पक्ष व्यासपीठाजवळ गोंधळ करत आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य शांतनु सेन यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातून निवेदनाची प्रत हिसकावली आणि त्या निवेदनाचे तुकडे केले होते .या परिस्थितीमुळे वैष्णव यांनी नंतर निवेदनाची प्रत सभागृहाच्या टेबलावर ठेवली. उपसभापती हरिवंश यांनी अशांतता निर्माण करणाऱ्या सदस्यांना असे वागू नये अशी विनंती केली होती पण त्यांचे ऐकले नाही.आणि तो गोंधळ तसाच सुरू राहिला होता.

Parliament session: TMC's Santanu Sen suspended from RajyaSabha
Pegasus: अंबानींचाही फोन हॅक? हेरगिरी प्रकरणात देशातील नवीन नावांचा खुलासा

तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य शांतनु सेन यांच्या निलंबनाच्या विरोधात गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी 11.25 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आणि निलंबनाच्या या गोंधळामुळे झिरो अवर आजही सभागृहात होऊ शकला नाही.

आज राज्यसभेच्या कामकाजाच्या सुरूवातीला अध्यक्षांनी संताप व्यक्त केला की संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोनासारख्या गंभीर विषयावर फक्त चार तास चर्चा झाली. याशिवाय गोंधळामुळे इतर कोणतीही कामे होऊ शकली नाहीत तसेच कोरोना महामारीच्या भीषण प्रसंगांदरम्यान हे अधिवेशन आयोजित केले गेले आहे आणि जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा ही झालीच पाहिजे असे ठाम मतही त्यांनी मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com