Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Shefali Jariwala Face Tattoo: २७ जून २०२५ रोजी अभिनेत्री शेफाली जरीवाला यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
Shefali Jariwala Face Tattoo
Shefali Jariwala Face TattooDainik Gomantak
Published on
Updated on

मनोरंजन क्षेत्राला धक्का बसवणारी घटना म्हणजे अभिनेत्री शेफाली जरीवालाचे अचानक झालेले निधन. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी पती पराग त्यागीला खूप वेळ लागला. चाहत्यांनीही या काळात त्याला प्रेम, सहानुभूती आणि आधार दिला.

आता मात्र पराग त्यागीने आपल्या पत्नीची आठवण कायमस्वरूपी हृदयात जपण्याचा एक अनोखा मार्ग निवडला आहे. त्याने आपल्या छातीवर शेफालीच्या चेहऱ्याचा टॅटू काढून घेतला आहे.

नुकताच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पराग टॅटू काढून घेताना दिसतो. व्हिडीओच्या शेवटी त्याच्या छातीवर दिवंगत पत्नी शेफालीचा चेहरा कोरलेला स्पष्ट दिसतो.

Shefali Jariwala Face Tattoo
Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

या खास प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेल्या टॅटू कलाकारानेदेखील आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणतो, “परागसोबत हा प्रोजेक्ट करणं माझ्यासाठी भाग्यवान क्षण आहे.”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देताना पराग त्यागीला “खऱ्या प्रेमाचं खरं उदाहरण” असं संबोधलं आहे.

Shefali Jariwala Face Tattoo
Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

शेफाली आणि परागची ओळख एका कॉमन मैत्रिणीच्या माध्यमातून झाली. दोघेही आधी मैत्रीत अडकले, नंतर प्रेमात पडले आणि २०१४ मध्ये एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. शेफालीला 'कांता लगा गर्ल' म्हणून ओळखले जात असे. २७ जून २०२५ रोजी शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परागने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com