POK मध्ये भारताविरुद्ध रचला जातोय कट; मोदी सरकारने जम्मू-काश्मीरसाठी तयार केला खास प्लॅन

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 2023 च्या अखेरीस शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit ShahDainik Gomantak

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 2023 च्या अखेरीस शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला. 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी लष्कराला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. आता गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पूंछ-राजौरीपासून काश्मीर खोऱ्यापर्यंत दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मोठी रणनीती आखली जात आहे. आयएसआय पीओकेमध्ये भारताविरुद्ध मोठा कट रचत असल्याची गुप्त माहिती आल्यानंतर हे सर्व केले जात आहे.

गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय सीमेपलीकडे म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कमांडरसोबत मोठा कट रचण्यात व्यस्त आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावर 600 हून अधिक बनावट अकाऊंट सक्रिय करण्यात गुंतले आहेत. या अकाऊंटद्वारे पाकिस्तान प्रायोजित अप्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेथील तरुणांना फसवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय सरकारी यंत्रणा यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यावर लवकरच मोठी पावले उचलली जाऊ शकतात. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय एका मोठ्या योजनेवर काम करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपुष्टात येईल.

Home Minister Amit Shah
Jammu And Kashmir: ''नेहरुंच्या चुकीमुळे PoK निर्मिती झाली, अन्यथा तो आज...'', अमित शाह यांचे लोकसभेत मोठे वक्तव्य

गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील डोंगराळ भागात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलांवर अनेकदा हल्ले केले आहेत. राजौरीपासून 12 किलोमीटर परिसरात असलेल्या नैसर्गिक गुहांचा दहशतवाद्यांकडून आश्रयस्थान म्हणून कसा वापर केला जात आहे, याचा तपशीलवार अहवाल सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात आला आहे. मात्र, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2018 मध्ये 228 दहशतवादी घटना घडल्या, तर 2023 मध्ये केवळ 44 दहशतवादी घटना घडल्या.

दहशतवादाबाबत गृहमंत्रालयाचे झिरो टॉलरन्सचे धोरण

गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2018 मध्ये 189 दहशतवादी चकमक झाल्या, तर 2023 मध्ये केवळ 48 दहशतवाद्यांशी चकमक झाली. 2018 मध्ये दगडफेकीच्या 1221 घटना घडल्या, तर 2023 मध्ये हे प्रमाण शून्यावर आले. त्याचवेळी, 2018 मध्ये संघटित संप जे 52 होते, ते 2023 मध्ये शून्य झाले. दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्याचा गृह मंत्रालयाचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये सर्वात मोठे आव्हान पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आहे, जे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये 66 च्या आसपास आहेत.

Home Minister Amit Shah
Jammu And Kashmir: प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानावरुन महाविद्यालयांमध्ये तणाव; अनेक ठिकाणी आंदोलने

तंझीम दहशतवाद्यांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करतो

जम्मू-काश्मीरमधील सूत्रांनी सांगितले की, सध्या 91 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यात 66 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. त्यात 25 स्थानिक दहशतवादी आहेत. तर गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 135 सक्रिय होते. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांची भरती कमी होत आहे. तरीही दहशतवादी संघटना कट्टरपंथी बनवण्यात व्यस्त आहेत. गृहमंत्रालयाच्या बैठकीत त्यांच्याविरोधात नियोजित कारवाई आणि स्थानिक लोकांकडून गुप्तचर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यावर चर्चा सुरु आहे.

Home Minister Amit Shah
Jammu and Kashmir: काश्मीरमध्ये पुन्हा 'टार्गेट किलिंग', यूपीच्या मुकेशची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

आयएसआय एक मोठा कट रचण्यात व्यस्त आहे

उत्तम इंटेलिजन्समुळे, 2022 मध्ये 187 दहशतवादी मारले गेले, त्यापैकी 130 स्थानिक दहशतवादी आणि 57 पाकिस्तानी दहशतवादी होते. 2023 मध्ये आतापर्यंत 72 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. यामध्ये 22 स्थानिक दहशतवादी आणि 50 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. येथे एक गुप्तचर माहिती देखील प्राप्त झाली आहे. दहशतवादी कमांडर आणि आयएसआय सीमेपलीकडे म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा कट रचत असल्याचे सांगण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावर 600 हून अधिक बनावट अकाऊंट सक्रिय करण्यात व्यस्त आहेत. दहशत माजवण्याच्या या प्रयत्नावर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. त्यावर लवकरच मोठी पावले उचलली जाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com