Pakistan: पाकिस्तान पुन्हा हादरले, पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला; 2 ठार, 7 जखमी

Pakistan News: मंगळवारी निमलष्करी दलाच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जण ठार झाले. मृतांमध्ये हल्लेखोर आणि एका सैनिकाचा समावेश आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: पाकिस्तानातील पेशावरमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी निमलष्करी दलाच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जण ठार झाले. मृतांमध्ये हल्लेखोर आणि एका सैनिकाचा समावेश आहे.

याशिवाय 7 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे दिसत आहे, जो पेशावरच्या हयाताबाद भागात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या हल्ल्याबाबत घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

Pakistan
Hindu Temple In Pakistan: 'पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिर आणि घरांवर हल्ले...,' सुरक्षेसाठी हाय अलर्ट जारी!

तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे

जिहादी गट तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, या हल्ल्यात एक सैनिक शहीद झाला आहे.

यासोबतच 7 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हयाताबाद मेडिकल कॉम्प्लेक्सचे वैद्यकीय संचालक प्राध्यापक शहजाद अकबर खान यांनी सांगितले की, स्फोटात जखमी झालेले दोन लोक येथे आले आहेत.

दोघांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित जखमींना सीएमएच या दुसऱ्या रुग्णालयात (Hospital) नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Pakistan
Pakistan News: पाकिस्तान बनणार IMFचा चौथा सर्वात मोठा कर्जदार, जाणून घ्या पहिले तीन कर्जदार देश?

दुसरीकडे, या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात हल्लेखोरांनी हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी प्रांतातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी हाय अलर्टचे आदेश दिले. त्याचबरोबर, 400 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले.

सिंध प्रांतातील कश्मोर भागात रविवारी हल्लेखोरांनी मंदिर आणि जवळपासच्या हिंदू घरांवर हल्ला केला. सिंधचे पोलिस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी प्रांतातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी हाय अलर्टचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिओ न्यूज पोर्टलने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com