उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे, 4 तरुणांनाही मारहाण; 5 जण गजाआड!

Muslim People Raised Slogans Pakistan Jindabad: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
Muslim People Raised Slogans Pakistan Jindabad
Muslim People Raised Slogans Pakistan JindabadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Muslim People Raised Slogans Pakistan Jindabad: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी 4 तरुणांनाही मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे.

त्याचबरोबर अज्ञात 25 ते 30 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नसीरुद्दीन, कमरुद्दीन, शमी, शेखू आणि हमीद यांच्यासह अज्ञात लोकांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या.

दुसरीकडे, विरोध केला असता 25 वर्षीय अमन सोनी आणि त्याच्या तीन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, वादाचे नेमके कारण अद्याप समजले नाही, परंतु पीडितांनी दावा केला की ते पाकिस्तान (Pakistan) समर्थक घोषणा देत होते. यानंतर जमावाने कोणतीही चिथावणी न देता त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.

तरुणांनी पळून आपला जीव वाचवला

दरम्यान, पीडित अमनने पोलिसांना (Police) दिलेल्या जबाबात तो राकेश राजपूत, सुहेल आणि विशाल चौहान या मित्रांसोबत चिलवारिया चौरस्त्यावर होता. यावेळी नसीरुद्दीनसोबत काही मुले आली. त्यांनी पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या आणि त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली.

त्याचवेळी आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांनी घोषणाबाजी थांबवली नाही तर पोलिसांना कळवू, असे म्हटले. मात्र, असे म्हटल्यावर ते संतप्त झाले आणि त्यांनी भांडण सुरु केले.

कसेबसे पळून जावून आम्ही आमचा जीव वाचवला, असे पीडितांनी सांगितले. सहकाऱ्यांनी चौघांनाही लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आहे.

Muslim People Raised Slogans Pakistan Jindabad
FIR on 100 years old lady: होय, खरंच! 100 वर्षीय महिलेवर खंडणीचा गुन्हा; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

मुलीने 10 दिवसांपूर्वी नारेबाजी केली होती

स्टेशन प्रभारी कोतवाली देहात मनोज पांडे यांनी सांगितले की, तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे 5 जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 147 (दंगल), 148 (प्राणघातक हल्ला), 323 (इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

हल्ल्यामागील कारण शोधण्यासाठी आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी बस्तीमध्ये एका मुलीने पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. जागरण दरम्यान, तिने मंचावर चढून माँ दुर्गा मूर्तीवर काळे कापड फेकले आणि घोषणाबाजी सुरु केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.