Pakistan Batter Sidra Amin
Pakistan Batter Sidra AminDainik Gomantak

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Pakistan Batter Sidra Amin: पाकिस्तानची स्टार क्रिकेटपटू सिद्रा अमीन हिला आयसीसीने चांगलेच फटकारले. या कारवाईसह तिला एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला.
Published on

Pakistan Batter Sidra Amin: महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूला आयसीसीने चांगलेच फटकारले. या कारवाईसह तिला एक डिमेरिट पॉईंट देखील देण्यात आला. मैदानावर राग व्यक्त केल्यामुळे सिद्रा अमिन हिच्यावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ही घटना 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडली. या सामन्यात भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा (Pakistan) संघ 159 धावांवर गारद झाला आणि त्यांना 88 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवातही सिद्रा अमीन हिने 81 धावांची शानदार खेळी करत एकहाती झुंज दिली होती.

Pakistan Batter Sidra Amin
Ind vs Pak: मैदानावर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा, पाकिस्तानी गोलंदाजानं डोळं वटारुन पाहिलं; पण धाकड हरमननंही दिलं चोख प्रत्युत्तर Watch Video

पिचवर बॅट आपटणे पडले महागात

आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सिद्रा अमीन हिने आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केले. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान बॅट, कपडे, मैदानाचे उपकरण किंवा फिटिंग्जचा गैरवापर करण्याशी संबंधित आहे.

  • ही घटना पाकिस्तानच्या डावातील 40व्या षटकात घडली, जेव्हा भारताची गोलंदाज स्नेह राणा हिने सिद्रा अमीनला बाद केले.

  • बाद झाल्यानंतर रागाच्या भरात सिद्राने आपली बॅट जोरजोराने पिचवर आपटली, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले.

आयसीसीने स्पष्ट केले की, गेल्या 24 महिन्यांमधील सिद्राचा हा पहिलाच गुन्हा असल्याने तिला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.

Pakistan Batter Sidra Amin
Ind vs Pak: "खेळात राजकारण येता नये" आशिया कप ट्रॉफीच्या वादावर एबी डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण, पाकड्यांची बाजू घेत म्हणाला...

सिद्राने गुन्हा केला मान्य

आयसीसीनुसार, सिद्रा अमीन हिने आपला गुन्हा कबूल केला आणि एमिरेट्स आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलच्या मॅच रेफरी शांद्रे फ्रिट्ज यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही औपचारिक सुनावणीची (Formal Hearing) गरज पडली नाही. ऑन-फिल्ड अंपायर लॉरेन एजनबैग आणि निमाली परेरा, थर्ड अंपायर केरिन क्लास्टे आणि फोर्थ अंपायर किम कॉटन यांनी सिद्रावर हा आरोप लावला होता.

Pakistan Batter Sidra Amin
IND vs PAK Final 2025: हाय-होल्टेज फायनलमध्ये अभिषेक शर्माच्या निशाण्यावर दोन मोठे रेकॉर्ड; 'इतक्या' धावांनी होणार 'विक्रमादित्य'!

आयसीसीच्या नियमांनुसार, लेव्हल 1च्या उल्लंघनासाठी किमान शिक्षा अधिकृत फटकार असते, तर कमाल शिक्षा म्हणून खेळाडूची 50 टक्के मॅच फीची कपात आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉईंट्स दिले जाऊ शकतात. या सामन्यात भारत (India) आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनी सामन्यानंतर हस्तांदोलन (Handshake) केले नाही. यापूर्वी, आशिया चषकातही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हीच 'नो हँडशेक पॉलिसी' (No Handshake Policy) स्वीकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com