
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली हे महत्त्वाचे नसून ती का पाडली गेली आणि त्यानंतर आम्ही काय केले हे महत्त्वाचे आहे, या सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’चा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करणार काय? असा सवाल काँग्रेसने केला.
पाकिस्तानने भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. हे खरे आहे काय, असा प्रश्न केला असता सरसेनाध्यक्ष चौहान यांनी पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे सिंगापूर येथे एका महिला पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
माहिती महत्त्वाची नाही. पण भारताची लढाऊ विमाने का पाडली गेली? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आम्हाला आमची तांत्रिक चूक उमगली. ती आम्ही सुधारली. दोन दिवसांनंतर भारताने पुन्हा सर्व जेट विमाने उडविली आणि पाकिस्तानातील ठिकाणांना पुन्हा लक्ष्य केले, असे चौहान म्हणाले.
२९ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध संपताच तीन दिवसांनंतर वाजपेयी सरकारने भारताच्या के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल आढावा समिती स्थापन केली. या समितीने विस्तृत अहवाल सादर केला.
या अहवालात आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर तो २३ फेब्रुवारी २००० मध्ये संसदेत मांडण्यात आला. आज के. सुब्रमण्यम यांचे पुत्र परराष्ट्र मंत्री आहेत, याची जाणीव करून देत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चौहान यांनी केलेल्या खुलाशानंतर सरकार आढावा समिती स्थापन करण्यासारखे पाऊल उचलणार काय? असा सवाल केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.