
Supriya Sule Speech In Parliament: लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर सोमवारी (28 जुलै) चर्चेला सुरुवात झाली. चर्चेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळाले. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे तोंडभरुन कौतुक केले.
एवढेच नाहीतर त्यांनी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे दाखलेही दिले. 1961 मध्ये भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवून दीव-दमण आणि गोव्याचे भारतात विलिनीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, सुळे यांनी पहलगाम हल्ल्याला 90 दिवस झाल्याचे सांगत त्यांनी राजोरी आणि पूंछ येथील हल्ल्यांचीही आठवण करुन दिली.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या एका खासदार महोदयांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. ते खासदार म्हणाले होते की, "भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) यांनी कधीही सैन्यदलाला प्रोत्साहित केले नाही किंवा त्यासाठी काहीच केले नाही. पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली आहे."
या वक्तव्याचा निषेध करत सुळे म्हणाल्या की, हे वक्तव्य आतापर्यंत आपल्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांचा (Martyred Soldiers) आणि त्यांच्या कुटुंबांचा अपमान आहे. संबंधित खासदार पाकिस्तानबरोबर (Pakistan) आपण पहिल्या युद्धात कमी पडलो असे सांगत होते. यावर सुळे यांनी लोकसभेत भारतीय सैन्याने आजवर मिळवलेल्या विजयांची (Victories) यादी वाचून दाखवली.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, 'जगभरात आम्ही जिथे कुठेही गेलो, तिथे सर्वजण आम्हाला आदराने पाहत होते. ते म्हणत होते की, 'तुम्ही महात्मा गांधी (Mahatma Gandhi), पंडित नेहरु (Pandit Nehru), इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) देशातून आला आहात.' यावेळी सुळे यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्याला (Tejashwi Surya) सल्ला दिला की, "या संधीवर कोणी काय केले यावर आरोप-प्रत्यारोप करणे टाळावे, किंवा त्यांनी इतिहास वाचावा."
सुप्रिया सुळे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "जोपर्यंत तुम्ही (सरकार) त्या दहशतवाद्यांना पकडत नाही, तोपर्यंत 'सिंदूर' यशस्वी होणार नाही. जोपर्यंत दहशतवादी पकडले जात नाहीत, तोपर्यंत त्याचा जल्लोषही करता येणार नाही." याशिवाय, त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना (S. Jaishankar) आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी करण्याच्या आवाहनावर विचार करण्याचे आवाहन केले. तसेच, लष्करी कारवाईच्या निष्कर्षांवर अजूनही स्पष्टता का नाही, असा सवाल देखील त्यांनी केला.
सुळे पुढे म्हणाल्या की, "दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेकजण पाठिंबा देतात. पण आपण पाकिस्तानबरोबर लढलो याबद्दल एकाही देशाने आपले कौतुक केले नाही, उलट युद्धविराम (Ceasefire) केला, त्याबद्दल आपले कौतुक केले." सत्ताधारी पक्षातील अनेकजण म्हणतात की, 'घुसून मारु', पण "जेव्हा युद्ध होते, तेव्हा फक्त विधवा महिला आणि लहान मुलेच राहतात," असे भावनिक विधानही त्यांनी केले.
तसेच, सुळे यांनी देशात 'ऑपरेशन सिंदूर'पूर्वीही अनेक मोठी ऑपरेशन्स (Operations) आणि युद्धे (Wars) झाल्याचे सांगितले. "मुंबई हल्ल्यात (Mumbai Attack) आम्ही दहशतवादी कसाबला (Ajmal Kasab) जिवंत पकडले होते," असे त्यांनी नमूद केले. जगभरात जिथे कुठेही भारताची बाजू मांडली, तिथे सर्वांनी भारताच्या युद्धविरामाच्या निर्णयाचे कौतुक केले, असेही सुळे यांनी सांगितले. या वक्तव्यांमुळे सुप्रिया सुळे यांनी एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडून प्रशंसा आणि प्रश्नांचा सामना केला.
मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) एका भाजपा आमदाराने कर्नल सोफिया कुरेशींबद्दल (Col. Sofia Qureshi) केलेल्या वक्तव्याचा, तसेच मिस्त्री यांच्या मुलीला ट्रोल (Troll) केल्याचा आणि जम्मू-काश्मीरमधील शिक्षणासाठी इतर राज्यात शिकत असलेल्या मुलांना मारहाण (Assault) करण्यात आल्याचा उल्लेख करत सुळे यांनी याकडेही लक्ष वेधले.
पहिले इंडो-पाक युद्ध: भारताचा विजय
ऑपरेशन पोलो (1948): हैदराबादचे भारतात विलिनीकरण.
ऑपरेशन विजय (1961): गोवा मुक्तीसंग्राम. पोर्तुगीजांविरोधातील लढाई जिंकून दीव-दमण आणि गोव्याचे भारतात विलिनीकरण
इंडो-पाक युद्ध (1965): पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचे चोख उत्तर
बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध, ऑगस्ट-सप्टेंबर (1971): मुक्तवाहिनीला तयार करुन भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानशी लढले. भारताने हे युद्ध जिंकले. 90 हजार पाकिस्तानी सैनिक शरण आले. 13 दिवसांत बांगलादेश स्वतंत्र केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.