Taj Mahalमध्ये जुने शिवमंदीर? खात्रीसाठी 22 दरवाजे उघडावे: उच्च न्यायालयात याचिका दाखल

आग्रा येथील ताजमहालमध्ये हिंदू शिल्पे आणि शिलालेख आहेत की नाही हे तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाला आदेश
Taj Mahal
Taj MahalANI
Published on
Updated on

ताजमहालमधील 22 बंद दरवाज्यांची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल करण्यात आली. आग्रा येथील ताजमहालमध्ये हिंदू शिल्पे आणि शिलालेख आहेत की नाही हे तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) 22 खोल्या उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. (Taj Mahal)

Taj Mahal
राहुल गांधींबद्दल बोलताना नेपाळी गायिका खत्री म्हणाल्या...

या याचिकेत तथ्य शोध समितीची स्थापना आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंदू देवतांच्या मूर्ती बंद दरवाजाआड बंदिस्त आहेत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

ताजमहालला तेजो महालय असे वर्णन करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात आज अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अयोध्या जिल्ह्याचे मीडिया प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचाही उल्लेख केला आहे.

Taj Mahal
'इंदिरा गांधींनीच पहिल्यांदा दिले होते अल्पसंख्याकांविरुध्द बुलडोझर चालवण्याचे आदेश'

एएसआयने ताजमहालच्या 20 बंद खोल्यांच्या सर्वेक्षणाच्या मागणीसह ही याचिका दाखल केली आहे. परिसराचे सर्वेक्षण करणे तसेच, सरकारला तथ्य शोध समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ताजमहाल संकुलाचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरुन शिवमंदिर आणि ताजमहालच्या अस्तित्वाची वस्तुस्थिती तपासता येईल. स्थापन करण्यात आलेली समिती या 22 खोल्यांची तपासणी करेल आणि तेथील हिंदू मूर्ती किंवा धर्मग्रंथांशी संबंधित पुरावे शोधतील. काही इतिहासकारांचा हवाला देत ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असे त्यात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com