'POK परत करणे हाच एकमेव मुद्दा उरला...' भारताने नाकारली अमेरिकेची मध्यस्थी

India rejects Trump mediation: डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली असता भारताने सपशेल ती नाकारली. भारताने स्पष्ट केले की, काश्मीर मुद्यासंबंधी तिसरा देश हस्तक्षेप करु शकत नाही. याबाबतचं वृत्त 'एएनआय'ने सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिले.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांची चांगलीच जिरवली. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उडवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने कुरापती करत भारतावर भ्याड हल्ल्यांचा निष्फळ प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. शनिवारी (10 मे) अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी कुरापती सुरुच ठेवल्या. भारतानेही या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली असता भारताने ती सपशेल नाकारली. भारताने स्पष्ट केले की, काश्मीर मुद्यावर तिसरा देश हस्तक्षेप करु शकत नाही. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले.

POK परत घेणे हाच मुद्दा उरला

भारत सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत (India) सरकार लष्करी भूमिकेवर अजूनही ठाम आहे. एवढचं नाहीतर भारताने काश्मीरबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. आता फक्त एकच मुद्दा उरला आहे तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेणे.

PM Modi
India Pakistan Ceasefire: शस्त्रसंधीमुळे भारताच्या पदरात काय पडले? पाकिस्तानला कुठला धडा शिकायला मिळाला?

भारताकडून टार्गेट निवडून हल्ले

उच्च सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देत सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश स्पष्ट होते की "पाकिस्तान (Pakistan) से गोली चलती है, तो यहां से भी गोली चलनी चाहिये." पाकड्याने भारतीय चौक्यांवर हल्ले केल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हद्दीत घुसून जशास तसे उत्तर दिले. भारतीय हवाई दलाने टार्गेट निवडून हल्ले केले, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या बहावलपूर, मुझफ्फराबाद आणि मुरीदके येथील दहशतवादी छावण्या नष्ट केल्या.

पाकड्यांना चोख प्रत्युत्तर

दुसरीकडे, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की पाकिस्तानकडून भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये किंवा परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणतीही राजनैतिक चर्चा झाली नाही. केवळ लष्करी पातळीवर लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यामार्फतच चर्चा झाली.

PM Modi
India Pakistan War:भारत-पाक युद्ध झाल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता; कोणाला बसणार मोठा फटका?

पाकिस्तानसोबत चर्चा फक्त 'या' मुद्द्यावरच होणार

मिळालेल्या माहितीनुसार, पाकड्यांसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर परत करण्याच्या आणि दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याच्या मुद्द्यावरच होईल. काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेणे. याशिवाय बोलण्यासारखे काही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com