Abdul Kalam Death Anniversary: तो एक फोन कॉल अन् मिसाइलमॅन बनले राष्ट्रपती

संपुर्ण जगात त्यांना 'मिसाईलमॅन' (Missile Man) या नावाने ओळखल्या जाते.
Dr. APJ Abdul Kalam
Dr. APJ Abdul Kalam Dainik Gomantak
Published on
Updated on

आज माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांची 7 वी पुण्यतिथी आहे. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे जन्मलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांना 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराचा झटका आला, जेव्हा ते IIM शिलाँग येथे एका कार्यक्रमादरम्यान व्याख्यान देत होते. एपीजे अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. जग त्यांना 'मिसाईलमॅन' (Missile Man) म्हणूनही ओळखते. अब्दुल कलाम यांना फोन करून राष्ट्रपती करण्यात आले. याचा उल्लेख त्यांनी स्वतः त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणुन घेउया या कथेबद्दल. (Abdul Kalam Death Anniversary News)

* कलामांच्या व्याख्यानांना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी यायचे
त्यांच्या 'टर्निंग पॉईंट्स: अ जर्नी थ्रू चॅलेंजेस' या पुस्तकात स्वत: अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे - तेव्हा मी अण्णा विद्यापीठात काम करायचो. माझ्या वर्गाची क्षमता 60 विद्यार्थ्यांची होती, पण माझ्या प्रत्येक लेक्चरला 350 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 10 व्याख्यान अभ्यासक्रम तयार करणे हे माझे उद्दिष्ट होते. ज्यात माझ्या राष्ट्रीय मिशनशी संबंधित अनुभवही असतील.

* जेव्हा थेट पंतप्रधान कार्यालयातून फोन आला
10 जून 2002 रोजी माझे त्या अभ्यासक्रमाचे नववे व्याख्यान होते. ज्याचे नाव होते 'व्हिजन टू मिशन'. माझे व्याख्यान संपवून मी परतत असताना अण्णा विद्यापीठाचे व्हीसी कलानिधी भेटले. त्यांनी मला सांगितले की कोणालातरी तुझ्याशी बोलायचे आहे. मी माझ्यासोबत श्री कलानिधी यांच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हाही फोन वाजत होता. फोन उचलला तर पलीकडून आवाज आला, पंतप्रधान साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे.

Dr. APJ Abdul Kalam
Karnataka: भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवाची हत्या; संतप्त कार्यकर्त्यांचे आंदोलन

* चंद्राबाबू नायडू म्हणाले - कृपया कलाम सर, नाही म्हणू नका

यानंतर कलाम साहेब कार्यालयात बसले आणि पंतप्रधानांच्या कॉलची वाट पाहू लागले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा फोन त्यांच्या मोबाईलवर आला. ते म्हणाले- पीएम साहेबांचा एक महत्त्वाचा कॉल तुमच्याकडे येणार आहे. कृपया नाही म्हणू नका. दुसरीकडे लँडलाईनवर बेल वाजली. यानंतर कलाम साहेबांनी फोन उचलला आणि दुसरीकडे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते.

* अटलजींनी फोनवर राष्ट्रपती होण्याची ऑफर दिली
फोनवर बोलत असताना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले- मी नुकताच सर्वपक्षीय बैठकीहून परतलो आहे. त्या बैठकीत आपण सर्वांनी मिळून देशाचे राष्ट्रपती व्हावे असा निर्णय घेतला आहे. मला हे आज जाहीर करायचे आहे. यासाठी मला तुमची संमती हवी आहे. यानंतर कलाम साहेबांनी अटलजींना यासाठी थोडा वेळ देण्यास सांगितले. यावर अटलजी म्हणाले- तुम्ही वेळ काढा पण मला हो ऐकायचे आहे. नंतर कलाम साहेबांनी या संदर्भात त्यांच्या काही जवळच्या मित्रांशी बोलले होते.

* कलाम अटलजींना नाही म्हणू शकले नाहीत आणि...
काही तास विचार करून कलाम साहेबांनी विचार केला की, वैज्ञानिक म्हणून मी देशासाठी काम करतोय, पण राष्ट्रपती (President) म्हणून मला देशसेवा करण्याची संधी आहे. त्यात काय नुकसान आहे? यानंतर त्यांनी स्वतः पंतप्रधानांना फोन करून राष्ट्रपती होण्यासाठी होकार दिला. दुसरीकडे केवळ एनडीएच नाही तर यूपीएनेही अब्दुल कलाम यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. डाव्या पक्षांनी लक्ष्मी सहगल यांना उमेदवारी दिली असली तरी कलाम साहेबांनी 25 जुलै रोजी देशाचे 12 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com