Hijab Row: 'दहशतवाद्यांना गणवेशाचं महत्त्व समजत नाही, पण मुस्लिम विद्यार्थी...'

कर्नाटकातील हिजाब प्रकरण (Hijab Row) मागील दीड-दोन महिन्यांपासून देशाच्या राजकारणात चांगलचं गाजत आहे.
Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील हिजाब प्रकरण (Hijab Row) मागील दीड-दोन महिन्यांपासून देशाच्या राजकारणात चांगलचं गाजत आहे. याच पाश्वभूमीवर आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) अल् कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याने कर्नाटकातील हिजाब प्रकरणी आंदोलकांच्या विरोधात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या मुस्लीम विद्यार्थिनी मुस्कान खानचे कौतुक करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर चांगलचे भडकले आहेत. ते म्हणाले की, 'हे अल कायदाला समजणार नाही. परंतु गणवेशाचे महत्त्व मात्र भारतीय मुस्लिमांना (Indian Muslims) नक्कीच कळते.' कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) हिजाबवरील बंदी कायम ठेवली होती. ज्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, 'जर धार्मिक कपड्यांवर बंदी घातली नाही तर शैक्षणिक संस्था धार्मिक व्यवहार प्रदर्शित करणारे व्यासपीठ बनेल.' (On Karnataka's hijab controversy Assam Chief Minister says Indian Muslims certainly understand the importance of uniforms)

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “तुम्ही हिजाब घातलात तर इतर विद्यार्थीही दुसरा पोशाख परिधान करतील ( It will become an ideology), मग शाळा आणि महाविद्यालये धार्मिक पोशाख आणि धार्मिक व्यवहार प्रदर्शन करणारे एक व्यासपीठ बनेल. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालये कशी सुरु ठेवता येतील (If hijab is allowed)? हिंदू-मुस्लिम असा भेद नसावा म्हणून युनिफॉर्म हा शब्द आला. हा युनिफॉर्म गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भेद मिटवततो.”

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Tea Controversy: MSK प्रसाद यांच विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या वादावर मोठं विधान 

माझा भारतीय मुस्लिमांबरोबर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहेः सीएम सरमा

सरमा म्हणाले, “अल कायदा कधीच समजणार नाही, पण मला खात्री आहे की, भारतीय मुस्लिमांना हे चांगलंचं समजतं. शैक्षणिक संस्थेत प्रवेश करताना आपण गणवेश परिधान केला पाहिजे. एकदा का तुम्ही तुमची शाळा-कॉलेज संपली की तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता आणि तुम्हाला हवे ते परिधान करु शकता. मला खात्री आहे की भारतीय मुस्लिम न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाशी सहमत असतील"

तत्पूर्वी, अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी याने कर्नाटकातील अलीकडील हिजाब वादाचा वापर करुन भारतीय लोकशाहीला लक्ष्य केले. "मूर्तिपूजक हिंदू लोकशाहीच्या मृगजळातून आपण फसत चाललो आहोत. त्यामुळे हे आपण थांबवले पाहिजे" असं त्याने म्हटले आहे. त्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकन SITE इंटेलिजन्स ग्रुपने सत्यापित केले आहे.

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Karnataka Hijab Row: 'हिजाब बंदी'च्या निकालावरुन पाकिस्तान आक्रमक

जवाहिरीने मुस्कान खानचे कौतुक केले

व्हिडिओ क्लिपमध्ये, जवाहिरीने फेब्रुवारीच्या सुरुवातीला कर्नाटकतील कॉलेजमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाशी सामना केल्याबद्दल कर्नाटकातील विद्यार्थी मुस्कान खानचे कौतुक केले. दुसरीकडे जवाहिरीच्या वक्तव्यापासून अंतर ठेऊन मुस्कानच्या वडिलांनी दहशतवादी संघटनेच्या नेत्याचे वक्तव्य खोटे ठरवले आहे. मी आणि माझे कुटुंबीय भारतात शांततेत राहत असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र म्हणाले की, '(Al Qaeda leader) व्हिडिओमधील त्याच्या वक्तव्यावरुन वादात अज्ञात घटकांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे.'

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Hijab Row: इंशा अल्लाह 'एक दिन हिजाबी प्रधानमंत्री बनेगी', ओवेसींचं ट्वीट होतयं व्हायरलं

अरबी भाषेत प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये SITE इंटेलिजन्स ग्रुपने इंग्रजी 'सब टायटल' (Translation) प्रदान केले आहे. हा गट जिहादी संघटना आणि ऑनलाइन गोर्‍या लोकांच्या वर्चस्वाचा दावा करणाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवतो. व्हिडिओमध्ये, जवाहिरीला एक गझल वाचताना देखील पाहिले जाऊ शकते.

तसेच, अल-कायद्याच्या या नेत्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "हिंदू भारताचे सत्य प्रकट करण्यासाठी आणि त्यांच्या मूर्तिपूजक लोकशाहीचा ढोंगीपणा उघड करण्यासाठी हे प्रकरण पुरेसे आहे." गेल्या सहा महिन्यांतील अल-कायद्याच्या प्रमुखाचा हा दुसरा व्हिडिओ असून त्यात त्याने हिजाबच्या वादाचा उल्लेख आहे.

दुसरीकडे, जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला जवाहिरी म्हणाला, "...आपल्या सभोवतालचा गोंधळ दूर करायचा आहे. भारताच्या मूर्तिपूजक हिंदू लोकशाहीची फसवणूक आपण थांबवली पाहिजे, ही सर्व मुस्लिमांच्या दडपशाहीची पद्धत आहे.''

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Karnataka Hijab Row: राज्यातील महाविद्यालये पुढील बुधवारपर्यंत राहणार बंद

याशिवाय, भारतीय उपखंडातील मुस्लिमांना संबोधित करताना, जवाहिरी म्हणाला, ''आपण हे लक्षात घेतले पाहिजे की वास्तविक जगात 'मानवी हक्क' किंवा 'संविधानाचा आदर करणे' किंवा 'कायदा' असे काहीही नाही. त्याने पुढे म्हटले की, "...पाश्‍चिमात्य देशांनी आपल्याविरुद्ध वापरलेले हे फसवेगिरीचे षड्यंत्र आहे, ज्याचे खरे स्वरुप फ्रान्स, हॉलंड आणि स्वित्झर्लंड यांनी उघड केले जेव्हा त्यांनी हिजाबवर बंदी घातली.''

आम्ही इथे बंधुभावाने राहतोय: मुस्कानचे वडील

चीनपासून इस्लामिक मुगारेबपर्यंत मुस्लिमांच्या एकजुटीचे आवाहन करत जवाहिरी म्हणाला, "आपण फक्त अल्लाहवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सक्रियपणे एकमेकांना मदत केली पाहिजे." जवाहिरी पुढे म्हणाला, "आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपल्यावर लादलेली सरकारे, विशेषतः पाकिस्तान आणि बांगलादेश. आम्हाला वाचवणार नाही, तर ते शत्रूंना वाचवतील ज्यांनी त्यांना आमच्याशी लढण्याचे बळ दिले आहे.

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Karnataka Hijab Row: आज मालेगाव आणि जयपूरमध्ये हिजाब मोर्चा

विशेष म्हणजे, कर्नाटकातील उडुपीमधील सरकारी पीयू कॉलेजमध्ये जानेवारीत हिजाबचा वाद सुरु झाला होता, जिथे हिजाब परिधान केलेल्या सहा विद्यार्थिनींना निर्धारित 'ड्रेस कोड' चे उल्लंघन केल्याप्रकरणी वर्गातून बाहेर काढले होते.

दरम्यान, जवाहिरीच्या व्हिडिओ क्लिपवर टिप्पणी करण्यास विचारले असता, मोहम्मद हुसैन खान यांनी कर्नाटकातील मंड्या मध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "आम्हाला याबद्दल (Video) काहीही माहिती नाही. तो कोण आहे, हे आम्हाला माहीत नाही. मी त्याला आज पहिल्यांदाच पाहिलं…आम्ही इथे प्रेमाने आणि बंधुभावाने राहत आहोत.”Muskaan

Hijab Row News, Himanta Biswa Sarma on Hijab Row Himanta Biswa Sarma News
Karnataka Hijab Row: 'विद्यार्थ्यांना हिजाब घालण्याचा आग्रह धरु नका'

जवाहिरीने व्हिडिओमध्ये मुस्कानचे कौतुक केल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "लोक माझ्यावर टीका करत आहेत... यामुळे अनावश्यक त्रास होत आहे. आम्ही देशात शांततेने राहत आहोत, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्याने याबद्दल बोलू नये असे आम्हाला वाटते... हे चुकीचे आहे, आमच्यात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे.' व्हिडिओ पाहून जवाहिरी जे काही बोलला ते चुकीचे आहे. मुस्कानचे वडील पुढे म्हणाले, "ती (Muskaan) अजूनही विद्यार्थिनी आहे, तिला अभ्यास करायचा आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com