World Tiger Day 2023: जागतिक व्याघ्र दिनानिमित्त सुदर्शन पटनायक यांनी साकारले वाघाचे अद्भूत वाळूशिल्प, पाहा व्हिडिओ

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर वाघाचे अद्भूत वाळूशिल्प साकारले आहे.
World Tiger Day 2023:
World Tiger Day 2023:Dainik Gomantak

World Tiger Day 2023: जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी 29 जुलैला साजरा केला जातो. या दिनानिमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर वाघाचे अद्भूत वाळूशिल्प साकारले आहे. सुदर्शन पटनायक यांनी एका बछडा सह वाघाची 15 फुट उंच वाघ वाळूत साकारला आहे. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने शेअर केला आहे.

वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न  आणि जनजागृती करण्यासाठी व्याघ्र दिन साजरा केला जातो. 26 जुलै 2010 मध्ये त्याची घोषणा रशिया मध्ये करण्यात आली होती.

  • इतिहास

हा दिवस 2010 पासून व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. रशियातील पीटर्सबर्ग येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत तेरा देश सहभागी झाले होते. 

  • कसा साजरा केला जातो हा दिवस

या दिवशी वाघांच्या संवर्धनासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले जाते. याद्वारे अधिकाधिक लोकांना वाघांविषयी माहिती देऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रबोधन केले जाते. वाघांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन आणि देणगी दिली जाते. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात राज्यनिहाय व्याघ्रगणनेची घोषणा करणार असून त्यावेळी गोव्यातील वाघांच्या या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होईल का? याची उत्सुकता पर्यावरणप्रेमींत आहे.

सत्तरी भागातील सुर्ला आणि साट्रे या जंगल भागात चार वाघांचा वावर दिसत असून मोले अभयारण्याच्या वरच्या करंझोळ डोंगरावर तीन वाघ वावरताना दिसतात.

याशिवाय नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातही अधून मधून पट्टेरी वाघ दिसून आले आहेत. वन खात्याच्या कॅमेऱ्यात या वाघांची छायाचित्रे कैद झाली आहेत.

वाघुर्मे आणि वाघुरे

गोव्यात काही गावांची नावे सुद्धा वाघाच्या अस्तित्वाशी जुळलेली असून फोंडा तालुक्यातील वाघुर्मे (सावईवेरे) आणि सत्तरीच्या वाघूरे या गावांचा समावेश आहे.

याशिवाय सत्तरी तालुक्यात असलेला वाघेरी डोंगर, पाळी येथील वाघबिळ, साट्रे येथील वाघाची होवरी, श्रीस्थळ काणकोण येथील वाघाहन्न (गुहा) खोतीगाव येथील वाघा डोंगर या जागाही वाघांशी संबंधित आहेत.

गोवा आणि वाघ

गोव्यात वाघांचे अस्तित्व फार पूर्वीपासून असून गोव्यात वाघांची शंभरपेक्षा अधिक देवळे असून धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण या तालुक्यात त्यांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती राजेंद्र केरकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com