Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

Odisha Plane Crash: राउरकेला येथून भुवनेश्वरच्या दिशेने निघालेले 'इंडिया वन एअर'चे 9-सीटर चार्टर्ड विमान शनिवारी (10 जानेवारी) दुपारी भीषण अपघाताचा शिकार झाले.
Odisha Plane Crash
Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Plane Crash: ओडिशामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राउरकेला येथून भुवनेश्वरच्या दिशेने निघालेले 'इंडिया वन एअर'चे 9-सीटर चार्टर्ड विमान शनिवारी (10 जानेवारी) दुपारी भीषण अपघाताचा शिकार झाले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विमानात असलेले दोन पायलट आणि चार प्रवासी असे एकूण 6 जण जखमी झाले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 'इंडिया वन एअर'च्या या विमानाने शनिवारी दुपारी राउरकेला विमानतळावरुन भुवनेश्वरसाठी उड्डाण केले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने जालदा परिसराजवळ 'इमर्जन्सी लँडिंग'चा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही आणि विमान वेगाने जमिनीवर कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Odisha Plane Crash
Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

पायलटसह सहा जण जखमी; बचावकार्य युद्धपातळीवर

विमानात कॅप्टन नवीन कडांगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह चार प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. 'फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस'च्या कमांड सेंटरने या बचावकार्याचे नेतृत्व केले. विमानातील सहाही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

हे विमान दुपारी 1:15 वाजता राउरकेला येथे उतरणे अपेक्षित होते, परंतु त्यापूर्वीच हा अपघात घडला. विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की खराब हवामानामुळे, याचा तपास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी विमानाच्या ढिगाऱ्याची पाहणी सुरु केली असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Odisha Plane Crash
Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

विमान सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

या अपघातानंतर प्रादेशिक विमान सेवा (Regional Aviation) आणि त्यांच्या सुरक्षा मानकांवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. लहान चार्टर्ड विमानांची देखभाल आणि आपत्कालीन स्थितीत सुरक्षित लँडिंगसाठी असलेल्या सोयीसुविधा यावर तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com