Sam Pitroda: ‘ईव्हीएमशी छेडछाड केली जावू शकते, मी 60 वर्षांहून अधिक काळ...’; सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

EVM System: लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा करासारखा वादग्रस्त प्रस्ताव मांडणाऱ्या सॅम पित्रोदा यांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sam Pitroda
Sam PitrodaDainik Gomantak

EVM System: लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा करासारखा वादग्रस्त प्रस्ताव मांडणाऱ्या सॅम पित्रोदा यांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ईव्हीएम प्रणाली ठीक नाहीये, त्याबदल्यात बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेणे चांगले आहे. ते पुढे म्हणाले की, मतमोजणी करुन विजय-पराजय ठरवणे ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. सॅम पित्रोदा यांनी X वर लिहिले की, ‘मी 60 वर्षांहून अधिक काळ इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम सारख्या क्षेत्रात काम केले आहे. मी ईव्हीएम प्रणालीचा पूर्ण अभ्यास केला आहे. मला विश्वास आहे की, यांमध्ये छेडछाड केली जाऊ शकते. केवळ बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जाव्यात आणि त्यांची मतमोजणी करुन विजय-पराजय ठरवला जावा, हे उत्तम आहे.’

दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम हॅक झाल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगानेही उत्तर दिले. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईव्हीएम ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेले नाही. यामुळे ते हॅक करता येत नाही. याशिवाय, ते अनलॉक करण्यासाठी OTP आवश्यक असल्याचा दावाही खोटा आहे. दरम्यान, ईव्हीएमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने (BJP) निवडणूक आयोगाकडे केली.

Sam Pitroda
Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

एका मीडिया रिपोर्टवरुन हा वाद सुरु झाला. त्यात दावा करण्यात आला होता की, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने त्यांच्या मोबाईलला ईव्हीएम कनेक्ट केले होते. ही घटना 4 जून रोजी घडली, ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल येत होते. या निवडणुकीत रवींद्र वायकर यांनी 48 मतांच्या फरकाने विजय मिळवला. अशाप्रकारे मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक करुन निकाल बदलल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता या प्रकरणाला वेग आला असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्टीकरण देत ईव्हीएममध्ये ओटीपीसारखी कोणतीही यंत्रणा नसल्याचे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com