Lucknow Rename: आता लखनऊचे नाव बदलणार? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानंतर...

Lucknow Rename Row: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज लखनऊचा उल्लेख लक्ष्मणनगरी आणि लखनपुरी असा केला.
President Draupadi Murmu
President Draupadi MurmuDainik Gomantak

Lucknow Rename Row: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज लखनऊचा उल्लेख लक्ष्मणनगरी आणि लखनपुरी असा केला. मुर्मू यांनी लखनऊचे भगवान लक्ष्मण यांच्याशी असलेले संबंध सांगितले. यापूर्वी, भाजप खासदाराने लखनऊचे नाव बदलून लक्ष्मणनगरी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, प्रतापगडचे खासदार संगम लाल गुप्ता यांनी नुकतेच लखनऊचे (Lucknow) नाव बदलून लक्ष्मणनगरी किंवा लखनपुरी करण्याची मागणी केली होती. भाजप खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लखनऊचे भगवान लक्ष्मण यांच्याशी कनेक्शन सांगितले आहे.

President Draupadi Murmu
उत्तर प्रदेश सरकारवर सावट; 3 आमदारांसह एका मंत्र्याचा राजीनामा

राष्ट्रपती म्हणाल्या की, "या शहराचे नाव भगवान रामाचे धाकटे बंधू लक्ष्मण यांच्या नावावरुन ठेवण्यात आले होते, असे म्हटले जाते. 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत या शहराला लखनपूर म्हणण्याची परंपरा चालू होती. दुसरीकडे, हे संस्कृतीचे प्रमुख केंद्र राहिले आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com