North India Rain Video: उत्तर भारतात प्रकोप; मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे 34 ठार

Rain: मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे पडणे आणि वीज पडून २४ तासांत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी हिमाचलमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत.
North India Rain
North India RainDainik Gomantak
Published on
Updated on

Heavy rain hits UP, Uttarakhand, Delhi, JK, Haryana and Punjab: उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे आणि वीज कोसळून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत.

याशिवाय यूपीमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 6, दिल्लीत 3, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाने रस्त्यांचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. तर राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांतील रस्ते पाण्यात बुडाले आहेत.

24 जूनला हिमाचलमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यापासून मोठा विध्वंस झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा मंडी आणि कुलू येथे ढगफुटीमुळे बियास नदीत अचानक पाणी वाढले, त्यात तीन पूल, एक एटीएम आणि चार दुकाने वाहून गेली.

अचानक आलेल्या पुरात गाड्या वाहून गेल्या

ढगफुटीनंतर बियास नदीला अचानक आलेल्या पुरामुळे कुल्लू-मनालीमध्ये अनेक वाहने वाहून गेली. मनाली-लेह, चंदीगड-मनालीसह पाच राष्ट्रीय महामार्ग, भूस्खलनामुळे 736 रस्ते बंद झाले आहेत. हेरिटेज कालका-शिमला ट्रॅकवर मलबा पडल्याने गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दिल्लीत पुराचा इशारा

दिल्लीतील यमुना नदीचे पाणी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे. रविवारी रात्री 9 वाजता जुन्या रेल्वे पुलावरील पाणी 203.62 मीटर उंचीवर होते, जे धोक्याच्या पातळीच्या 1.71 मीटर खाली होते.

यमुनानगरमधील हथिनीकुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडल्यामुळे दिल्ली सरकारने पुराचा इशारा जारी केला आहे. आतापर्यंत एक लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे.

दिल्लीत रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला. 41 वर्षांपूर्वी 25 जुलै 1982 रोजी झालेल्या 169.9 मिमी पावसानंतरचा हा उच्चांक आहे.

शनिवारपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
शनिवारपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.Dainik Gomantak

उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस

पंजाब: पतियाळा, फाजिल्का, होशियारपूर, फतेहगढ साहिबसह विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पटियालामध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला असून सखल भागातील घरे रिकामी करण्यात आली आहेत.

चंदीगडमध्ये २४ तासांत ३२२ मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हरियाणा: अंबाला, यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल आणि कैथलसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारपासून अंबालामध्ये 270 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उत्तराखंड: येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भूस्खलनामुळे 175 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. गंगोत्री-यमुनोत्री महामार्ग रात्री आठ ते पहाटे पाचपर्यंत बंद राहणार आहे.

श्री अमरनाथ यात्रा पूर्ववत

जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा रविवारी तिसऱ्या दिवशी पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून पूर्ववत करण्यात आली.

रविवारी गुहा मंदिराभोवती आकाश निरभ्र झाल्यानंतर भाविकांना बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

मुसळधार पावसामुळे डोडा येथे दरड कोसळून प्रवासी बसचा चालक आणि वाहक जागीच ठार झाले. उधमपूरमधील तवी आणि दक्षिण काश्मीर-श्रीनगरमधील झेलम नदी धोक्याच्या चिन्हावर आहे.

हवामान खात्याने कठुआ, सांबा येथे रेड अलर्ट जारी केला असून नदी-नाल्याजवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे.

North India Rain
West Bengal Panchayat Election 2023: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी होणार पुन्हा मतदान

मोहाली: मोहालीतील जिरकपूर येथील गुलमोहर हाउसिंग सोसायटीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. गाड्या बुडाल्या. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्यामुळे लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागली.

लुधियानामधील खन्ना येथे सतलजच्या किनाऱ्यावर अडकलेल्या 50 जणांची सुटका करण्यात आली आहे. रोपर-नांगल रेल्वे ट्रॅक उखडला आहे. भटिंडा येथेही एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com