तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यात गुंतले आहेत. या संदर्भात केसीआर बुधवारी एक दिवसीय दौऱ्यावर पाटणा येथे पोहोचले. सीएम नितीश कुमार आणि डेप्युटी सीएम तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नितीश कुमार पत्रकारांच्या प्रश्नांनी अस्वस्थ होऊन फिरू लागले, त्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी तत्परतेने उत्तरे दिली.
यादरम्यान नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केसीआर यांना अनेकवेळा उठून चालण्यास सांगितले. पण चंद्रशेखर राव त्यांना थांबवत पत्रकाराला उत्तर देत राहिले. खरंतर, जेव्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना विचारले गेले की नितीश कुमार 2024 मध्ये विरोधी छावणीचे नेतृत्व करतील का? हे ऐकताच नितीश कुमार खुर्ची सोडून उठून उभे राहिले आणि केसीआरलाही चलायला सांगितले. बराच वेळ गोंधळ सुरू होता. पण केसीआर बिनधास्तपणे बोलत राहिले आणि नितीशकुमार त्यांच्या शेजारी उभे राहिले.
'अरे.. चलिये ना, ये पत्रकार फालतु सवाल कर रहे है'
यादरम्यान नितीश कुमार केसीआरला (KCR) वारंवार सांगत होते की, तुम्ही पत्रकारांच्या या प्रश्नांमध्ये पडू नका. पण केसीआर नितीश कुमार यांच्या हात पकडुन बसवण्याचा प्रयत्न करत राहिले. मात्र नितीश कुमार बसायला तयार नव्हते. हा सर्व प्रकार पाहून तेथे उपस्थित लोक हसू लागले.
यादरम्यान केसीआर यांना विचारण्यात आले की, तिसरी आघाडी स्थापन होणार का आणि त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? यावर त्यांनी बोलूनच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू, असे उत्तर दिले. तुम्ही लोक काळजी करू नका. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की या आघाडीत काँग्रेसची (Congress) भूमिका काय असेल? राहुल गांधींची भूमिका काय असेल? त्यावर नितीश कुमार म्हणाले की, आमची 'मेन फ्रंट' आहे, थर्ड फ्रंट काय असते.'
लोकसभा निवडणूक 2024
पुढील लोकसभा निवडणुका 2024 च्या पूर्वार्धात होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच संकेत दिले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) पंतप्रधानपदाचे उमेदवार राहतील.
पण, दुसरीकडे परिस्थिती तणावपूर्ण आहे. विरोधी पक्षांमध्ये असे अनेक नेते आहेत, ज्यांना राज्याच्या राजकारणातील बेड्या तोडून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करायचा आहे. ज्यात नितीश कुमार, केसीआर, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. आपल्या नेत्याला पंतप्रधान चेहरा म्हणून उभे करण्यासाठी काँग्रेस नेहमीच "बलवान" उमेदवार आहे. कारण ते देशातील सर्वात जुने राजकीय पक्ष आहेत. मात्र, राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे केल्याने फारसा फायदा झाला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.