NIA चा मोठा दावा, 'भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा PFI चा डाव'

NIA Raid: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत.
PFI
PFIDainik Gomantak
Published on
Updated on

NIA Claim: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. एनआयएने छापेमारीनंतर दावा केला की, पीएफआय मुस्लिम तरुणांना लष्कर, इसिस आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी PFI देशभरातील मुस्लिम तरुणांना लक्ष्य करते. यानंतर त्यांचे ब्रेनवॉश करुन दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

तरुणांना दहशतवादी बनवण्याचे प्रशिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने केरळमधील विशेष न्यायालयासमोर हा खुलासा केला आहे. एनआयएने पीएफआय सदस्य आणि कार्यकर्त्यांवर शांतता भंग करण्याचा आणि भारताविरुद्ध (India) कट रचल्याचा आरोप केला आहे. एनआयएने न्यायालयातून अटक केलेल्या आरोपींच्या रिमांडची मागणी केली. त्याचबरोबर, पीएफआय नेते, सदस्य आणि कार्यकर्ते मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि त्यांना इस्लामिक स्टेट (Islamic State) सारख्या प्रतिबंधित दहशतवादी (Terrorist) संघटनांमध्ये भरती करण्यात गुंतले होते, असा दावाही एनआयएने केला.

PFI
NIA RAID: केरळपासून ते तामिळनाडूपर्यंत पीएफआयचे तीव्र निदर्शने

भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याचा कट

एनआयएची कोच्चि ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएने (NIA) आरोपी करमना अशरफ मौलवी, पीएफआयच्या शिक्षा विभागाचे राष्ट्रीय प्रभारी आणि इतरांची कोच्ची येथील विशेष न्यायालयासमोर न्यायालयीन कोठडी मागितली आहे. एनआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आरोपींनी धार्मिक शत्रुत्व निर्माण करुन बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा कट रचला होता.

एजन्सीने पुढे म्हटले की, संघटना कथितरित्या भारताविरुद्ध असंतोष निर्माण करत आहे. पर्यायी न्याय प्रणालीला प्रोत्साहन देत आहे. पीएफआयने हिंसक जिहादचा भाग म्हणून दहशतवादी कारवाया करुन भारतात इस्लामिक राजवट स्थापन करण्याचा कट रचला होता.

PFI
UP अन् केरळसह अनेक राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर NIA चे छापे

याशिवाय एनआयएने पुढे सांगितले की, छाप्यादरम्यान पीएफआयच्या ठिकाणांवरुन आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये विशिष्ट समुदायाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्टपणे दिसून येते की, पीएफआय नेते सहयोगी संस्थांच्या माध्यमातून काम करत आहेत. विशेष म्हणजे, देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. गुरुवारी NIA, ED आणि काही राज्यांच्या पोलिसांच्या माध्यमातून PFI च्या 93 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये PFI च्या एकूण 106 लोकांना अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com