Expressway Rules: जाऊदे जोरात! आता एक्स्प्रेस वेवर हळू गाडी चालवल्यास लागणार दंड; वाचा, काय आहे प्रकरण?

NHAI Expressway Rules: हायवेवरील ओव्हरटेकिंग लेनवर चालक हळू गाडी चालवताना आढळल्यास, त्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
Expressway
ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

एक्स्प्रेस वे किंवा हायवेवर प्रवासादरम्यान आपण अनेकदा ऐकतो की जास्त वेगाने गाडी चालवणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे दंडही होऊ शकतो, पण तुम्ही ऐकले आहे की कमी वेगाने गाडी चालवल्यास दंड भरावा लागतो.

ऐकायला विचित्र वाटेल पण हेच वास्तव आहे. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर हळू गाडी चालवणाऱ्यांचा त्रास वाढू शकतो कारण त्यांना 2000 रुपयांपर्यंतचा दं ड केला जाऊ शकतो.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर हळू गाडी चालवल्याबद्दल तुम्हाला 2000 रुपये दंड भरावा लागेल. वाहतूक नियम कायद्यांतर्गत त्याचे नियम बदलण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर चिपियाना रेल्वे ओव्हर ब्रिज बांधल्यानंतर नियम लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत ओव्हरटेकिंग करताना विहित वेग नसल्यास ५०० ते २००० रुपयांचे चलन आकारले जाईल.

Expressway
Delhi High Court: बलात्काराच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी विवाहाची ढाल; संतापजनक प्रकार वाढत असल्याने कोर्टाने फटकारले

ओव्हरटेकिंग करताना जास्त अपघात

या नवीन तरतुदीबाबत NHAI तज्ञ संदीप कुमार यांनी सांगितले की, बहुतेक अपघात ओव्हरटेक करताना होतात.

लोक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा कमी वेगाने गाडी चालवतात, विशेषत: एक्सप्रेसवेवर. त्यामुळे वाहनांना ओव्हरटेकिंगचा मार्ग मिळत नाही.

या सर्व बाबी गांभीर्याने घेत ओव्हरटेकिंग मार्गावर धीम्या गतीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नियम करण्यात आला आहे.

Expressway
Modi Surname Defamation Case: राहुल गांधींची याचिका फेटाळली, २ वर्षांची शिक्षा कायम

अपघात रोखणे मुख्य लक्ष्य

लोकांना सहज ओव्हरटेक करता येईल आणि अपघाताचा धोका टळता येईल, हा या निर्णयाचा मूळ उद्देश आहे.

ड्रायव्हर्सना जागरूक करण्यासाठी NHAI द्वारे जाहिरात देखील जारी केली जाईल जेणेकरुन ड्रायव्हर्सना नियमांबद्दल आधीपासूनच अपडेट केले जाईल आणि त्यांना हळू चालवल्याबद्दल चालनाबद्दल देखील माहिती असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com