दक्षिण भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट;15 पटींनी वाढला मृत्यूचा धोका

New variant of Corona found in South India 15 times increased risk of death
New variant of Corona found in South India 15 times increased risk of death

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना दक्षिण भारतामध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणुमुळे चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) आढळला आहे. या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटला N440K शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. या कोरोना विषाणूची तिव्रता 15 पटीने अधिक असल्याचं सेंटर फॉर सेल्यूलर अ‍ॅन्ड मॉलिक्यूलर बायोलॉजीतील शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या विषाणूमुळे 3 ते 4 दिवसामध्ये रुग्ण बाधित होतो. (New variant of Corona found in South India 15 times increased risk of death)

N44OK हा कोरोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.617 व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याचं दिसून आलं आहे. हा नवा कोरोना विषाणू लगेच आपल्या कवेत घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 3 ते 4 दिवसामध्येच कोरोना रुग्णाची स्थिती खलावत असल्याने हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोगप्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही भारी पडत आहे. 

दक्षिण भारतात N44OK हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आपलं पाय पसरत आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, आणि तेलंगणामध्ये या नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात B.1, B.1.1.7, B.1.351, B.1.617 आणि B.1.36 या नव्या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत.

देशामध्ये B.1.1.7 या नव्या कोरोना व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर अलेल्या माहितीनुसार हा विषाणू घातक असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com