सुखजिंदर सिंग रंधावा होऊ शकतात पंजाबचे नवे मुख्यमंत्री

पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षालाही नुकसान होऊ शकते.
Sukhjinder Randhawa
Sukhjinder RandhawaDainik Gomantak
Published on
Updated on

कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्ष आज पुढील मुख्यमंत्री निवडू शकते. अमरिंदर सिंग यांचा नवज्योत सिंग यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अमरिंदर सिंग यांनी शनिवारी आपला अपमान झाल्याचे सांगत राजीनामा दिला. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षालाही नुकसान होऊ शकते.

Sukhjinder Randhawa
Breaking: पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत 2 ते 3 तासात निर्णय होणार

सूत्रांनी सांगितले की सुखजिंदर रंधावा (Sukhjinder Randhawa) हे पंजाबचे पुढील मुख्यमंत्री असू शकतात. तीन वेळा आमदार असलेले, 62 रंधावा अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात कारागृह आणि सहकार मंत्री होते. गुरदासपूरचे रहिवासी रंधावा हे पंजाब काँग्रेसचे उपाध्यक्षही राहिले आहेत. त्यांचे वडील संतोख सिंह दोन वेळा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com