RJD on New Parliament Building : नव्या संसद भवनाची शवपेटीशी तुलना; आरजेडीच्या ट्विटमुळे वातावरण तापले

RJD Tweet : नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर डझनभर पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे.
RJD Tweet on New Parliament Building
RJD Tweet on New Parliament BuildingDainik Gomantak
Published on
Updated on

Central Vista Project

28 मे हा दिवस देशाच्या संसदीय इतिहासात ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. दरम्यान अनेकजन या नव्या संसद भवनाचे कौतुक करत आहेत. काहींनी याला जोरदार विरोध केला आहे.

अशात राष्ट्रीय जनता दलाने संसदेच्या नवीन इमारतीची तुलना शवपेटीशी केली. राजदचे नेते शक्ती यादव म्हणाले की, लोकशाहीची शवपेटी केली जात आहे. राष्ट्रपती हे संसदीय व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असतात, पण त्यांना न बोलावून त्यांचा अपमान करण्यात आला आहे, हे घटनेच्या कलम 79 मध्ये स्पष्ट आहे.

नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर डझनभर पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे.

आरजेडीच्या अधिकृत हँडलवरून एका ट्विटमध्ये, नवीन संसदेच्या डिझाईनची शवपेटीशी तुलना करून दोन छायाचित्रे पोस्ट करण्यात आली असून, हे काय आहे? यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

RJD Tweet on New Parliament Building
New Parliament Building: लावा ताकद! 'अत्याधुनिक' सायबर सुरक्षा प्रणाली नव्या संसद भवनाची ढाल

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी शनिवारी सकाळी विधिवत पूजा करून नवीन संसदेचे उद्घाटन केले. संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी विरोधी पक्षांची मागणी होती. याबाबत 19 हून अधिक पक्षांनी सामूहिक पत्र लिहून उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. बहिष्कार घालणाऱ्या पक्षांमध्ये राजदचाही समावेश आहे.

आता आरजेडीने संसद भवनाची तुलना शवपेटीशी केली आहे. त्यावर उत्तर देताना भाजप नेते दुष्यंत गौतम यांनी विचारले आहे की, 'तुम्ही आधीच्या संसदेला शून्य म्हटले होते का? कारण त्याचा आकार शून्यासारखा होता आणि आपण शून्यातच बसलो होतो.

2024 मध्ये मोदी प्रचंड बहुमताने येत आहेत, हे सर्व त्यांच्या विरोधात आहे बाकी काही नाही. ज्यांनी आणीबाणी लादली, तेच लोक आज लोकशाहीसाठी ओरडत आहेत.

त्याचवेळी बिहारचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी आरजेडीच्या या ट्विटचा निषेध करताना हे लाजिरवाणे म्हटले आहे आणि अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे म्हटले आहे.

RJD Tweet on New Parliament Building
Snake In Mid Day Meal : किडे आणि सरड्यांनंतर आता माध्यान्ह भोजनात साप; 20 हून अधिक मुले रुग्णालयात दाखल

उद्घाटन समारंभात आयोजित बहु-विश्वास प्रार्थना सभेत सहभागी झालेले जैन धर्मगुरू आचार्य डॉ. लोकेश मुनी म्हणाले, 'आज आम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो जेव्हा नवीन संसदेत 'धर्म दंड' बसवण्यात आला. शीख गुरु बलबीर सिंग म्हणाले, नवीन संसद स्थापन झाली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. मी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवतो, मी एवढेच म्हणेन की देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com