Supreme Court: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत SC मध्ये याचिका, 'राष्ट्रपतींना न बोलावणे घटनाबाह्य...'

New Parliament Building Inauguration: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (SC) पोहोचले आहे.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

New Parliament Building Inauguration: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (SC) पोहोचले आहे. याचिकेत पंतप्रधानांकडून नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणे घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.

नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रित न करणे घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे संविधानाचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. दुसरीकडे, नवीन संसद (Parliament) भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांच्या सुमारे 19 पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

त्याचवेळी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Supreme Court
Supreme Court: ममता सरकारला मोठा झटका, SC ने पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी'वरील बंदी उठवली!

19 विरोधी पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली

विशेष म्हणजे काँग्रेस (Congress), डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, सपा आणि आम आदमी पार्टीसह 19 विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. केंद्रातील विद्यमान सरकारच्या काळात संसदेतून लोकशाहीचा आत्मा काढून टाकण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

ओवेसींनी आपली वेगळी मागणी ठेवली

त्याचवेळी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते व्हायला हवे. तसे न झाल्यास त्यांचा पक्ष उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाही.

Supreme Court
Supreme Court: माध्यान्ह भोजनात मुलांना चिकन आणि मटण का देत नाहीत? SC ने विचारला जाब

विरोधी ऐक्यात फूट!

मात्र, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावरुन विरोधी पक्षात फूट पडल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, विरोधकांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करावा. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांच्या पक्ष काँग्रेसपेक्षा वेगळे मत मांडले आहे.

दुसरीकडे, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत विरोधकांच्या बहिष्कारावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हल्लाबोल केला आहे. सीएम योगी म्हणाले की, 'देशाच्या गौरवशाली दिवसाचा अपमान करणे बेजबाबदारपणाचे आहे. विरोधकांचे बहिष्काराचे राजकारण शिगेला पोहोचले आहे.'

Supreme Court
Supreme Court: गोध्रा हत्याकांडातील 8 दोषींचा जामीन अर्ज SC कडून मंजूर, 58 कारसेवकांना...

तसेच, नवीन संसदेच्या उद्घाटनावरुन विरोधी पक्ष पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. यातच आता, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनीही विरोधकांच्या बहिष्काराचा समाचार घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com