Twitter
TwitterDainik Gomantak

केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात ट्विटरची हायकोर्टात धाव

केंद्र सरकारच्या काही आदेशांविरोधात ट्विटरने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Published on

Twitter Moves High Court: केंद्र सरकारच्या काही आदेशांविरोधात ट्विटरने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंटेंटबाबत सरकारचे काही आदेश मागे घेण्याची मागणी कंपनीने केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, ट्विटरने अधिकार्‍यांच्या अधिकाराच्या गैरवापराला कायदेशीर आव्हान दिले आहे. (New It Rule Twitter Moves Karnataka High Court Against Government Orders)

दरम्यान, 27 जून रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) जारी केलेल्या अंतिम सूचनेचे ट्विटरने पालन केले आहे. मंत्रालयाने ट्विटरसाठी 4 जुलै ही अंतिम मुदत ठेवली होती.

Twitter
'इराणी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रेषित मुहम्मदांचा मुद्दा आला नाही': केंद्र सरकार

तसेच, ट्विटरला (Twitter) काही अकाउंटवर कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. परंतु सरकारने (Government) दिलेल्या सूचनांचे कंपनीने पालन केले नाही. दरम्यान, ट्विटरने सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

Twitter
केंद्र सरकार कडून इंधनदरात कपातीच्या घोषणेनंतर पहा आजचा पेट्रोल, डिझेलचा दर एका क्लिकवर

दुसरीकडे, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान ( IT) मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ''कोणतीही कंपनी मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केले पाहिजे. देशाच्या संसदेने संमत केलेल्या कायद्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com