Earthquake: दिल्ली-NCR, यूपी अन् उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 5.8 ची नोंद

Earthquake: दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake: दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जमीन काही सेकंद हादरत राहिली. रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 मोजली गेली.

भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती

कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना धक्काच बसला. काही लोक ऑफिसमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. दिल्लीतील भूकंपासह उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल, मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूर येथे दुपारी अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake
Earthquake: हिमाचल प्रदेशात भूकंपाचे हादरे, 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

दिल्लीचे रहिवासी अमित पांडे म्हणाले की, "मी सिविक सेंटरमधील एका ब्लॉकच्या पाचव्या मजल्यावर होतो. मला माझ्या पायाखालून खडखडाटाचा आवाज आला आणि थोडासा धक्का जाणवला, थोड्या वेळाने हादरे थांबले.''

लोक घराबाहेर आले

अचानक धरती हादरल्याने लोक घराबाहेर पडले. शाहजहांपूरमध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. यासोबतच बरेलीमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यासोबतच नेपाळ, भारत आणि चीन या भूकंपाचा फटका बसलेल्या देशांचा समावेश आहे.

Earthquake
Earthquake in Delhi-NCR: दिल्ली आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंपाने हादरली, काश्मीर खोऱ्यातही...

नेपाळमधील भूकंपाचे केंद्र

त्याचे केंद्र नेपाळपासून (Nepal) 12 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे, याआधी 5 जानेवारीला दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यादरम्यान रात्री 8 वाजता दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

Earthquake
Earthquake: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 'या' 3 ठिकाणी भूकंप

तसेच, नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली आणि एनसीआरमध्ये 1.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणामध्ये होता. या भूकंपाची खोली 5 किलोमीटर इतकी होती. गुरुवारच्या भूकंपाच्या आधी 29 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्लीत 2.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता. दुसरीकडे, 12 नोव्हेंबर रोजी 5.4 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com