Neiphiu Rio Swearing In Ceremony: नागालँडच्या राजकारणातील दिग्गज नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी (7 मार्च) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजधानी कोहिमा येथे झालेल्या समारंभात राज्यपाल ला गणेशन यांनी त्यांना शपथ दिली.
नागालँडचे मुख्यमंत्री बनण्याची ही पाचवी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
दरम्यान, नागालँड (Nagaland) विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये, राज्यातील नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजप युतीने बहुमत मिळवले. एनडीपीपीने 40 आणि 20 जागांवर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत एनडीपीपी आणि भाजपने अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या.
युतीचा भाग असलेल्या भाजपला (BJP) उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. भाजपचे यानथुंगो पॅटन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप विधिमंडळ पक्षाने त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली आणि निरीक्षक रणजित दास यांच्या उपस्थितीत एकमताने यानथुंगो पॅटन यांची नेता म्हणून निवड केली.
मेघालयप्रमाणे, येथेही दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. यानथुंगो पॅटन यांच्यासोबत, टीआर झेलियांग यांनीही राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.