NEET पीजी परीक्षा ढकलली पुढे, नवीन तारीख लवकरच होणार जाहीर

कोरोनाच्या वेळी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
NEET PG Exam
NEET PG ExamDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 6-8 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. एनईईटी पीजी परीक्षेबाबत, कोरोनाच्या (Corona) वेळी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी कोविड-19 मुळे त्यांची इंटर्नशिप पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. (NEET PG exam 2022 Postponed News)

NEET PG परीक्षा 2022 12 मार्च रोजी विविध केंद्रांवर होणार होती, परंतु आता ही परीक्षा होणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे . सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण होईपर्यंत परीक्षेची तारीख वाढवण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उमेदवारांच्या बाजूने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. उमेदवारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

NEET PG Exam
केरळमध्ये वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही

मात्र, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा पुढे ढकलली आहे. NEET PG उमेदवारांचे म्हणणे आहे की ते 2021 मध्ये कोविड ड्युटीमध्ये नियुक्त झाले होते, त्यामुळे त्यांची इंटर्नशिप पुढे ढकलण्यात आली आहे. इंटर्नशिप पूर्ण न केल्यामुळे NEET PG 2022 च्या परीक्षेत बसणे कठीण होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नवीन तारखांसह तारीखपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. सध्या ही परीक्षा केवळ 6 ते 8 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com