President Election: राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उद्या गोवा दौऱ्यावर

द्रौपदी मुर्मू उद्या गोव्यातील आमदारांची भेट घेणार, मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चिंता नाही
Draupadi Murmu
Draupadi MurmuDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) उद्या 14 जुलै रोजी गोव्याला भेट देणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गोवा युनिटचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी दिली. द्रौपदी मुर्मू उद्या गोव्यातील आमदारांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रचारासाठी मुर्मू गोवा दौऱ्यावर येत आहेत,' असे तानावडे यांनी विधानसभा संकुलात पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Draupadi to visit Goa on July 14)

Draupadi Murmu
राज्यातील आमदार, खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा : गावडे

दरम्यान, मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चिंता नसल्याचे तानावडे यांनी सांगितले. किमान 60 ते 70 टक्के मतदान एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर भाजपच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांचाही पाठिंबा मुर्मू यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तानवडे यांनी दिले आहे.

Draupadi Murmu
Presidential Election: द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने दिला पाठिंबा

भाजपने अध्यक्षपदासाठी प्रथमच एसटी समाजातील उमेदवार आणि महिलेला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांना भाजपने या पदासाठी उमेदवारी दिली होती. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतपेटी आणि इतर मतदान साहित्य संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या नोडल अधिकारी आयशा वायंगणकर आणि गोवा राज्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी हर्क्युलस नोरोन्हा यांना गोव्यात आणले आणि बुधवारी गोवा विधानसभा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com