Operation Samudragupta: NCB आणि नौदलाची मोठी कारवाई, कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त; एक पाकिस्तानी गजाआड

Kerala News: एजन्सीचा दावा आहे की, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग कन्साइनमेंट आहे.
Drugs
DrugsTwitter/ @ANI

Operation Samudragupta: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाने शनिवारी केरळच्या कोची किनारपट्टीवर 12,000 कोटी रुपयांच्या 2,500 किलो ड्रग्जची खेप जप्त केली. एजन्सीचा दावा आहे की, ही भारतातील (India) आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग कन्साइनमेंट आहे.

ऑपरेशन समुद्रगुप्त अंतर्गत यश मिळाले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रग्ज एजन्सी आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी नागरिकालाही (Citizens) ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे भारतात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम 'ऑपरेशन समुद्रगुप्त' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Drugs
Supreme Court On CBI: 'तपासाचा हाच दर्जा असेल तर सीबीआय...', SC ने उच्च न्यायालयाचा आदेश केला रद्द

ड्रग्ज घेऊन जाणारे मदर जहाज अडवले

एनसीबीनुसार, मेथॅम्फेटामाइनला 'डेथ क्रिसेंट' असेही म्हणतात. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय एजन्सीने ड्रग्ज घेऊन जाणारे ‘मदर शिप’ पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com